“पद्मभूषण पुरस्कार RSS, संघ स्वयंसेवकांना समर्पित”: भगतसिंह कोश्यारी; विरोधकांनाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 15:01 IST2026-01-26T15:01:26+5:302026-01-26T15:01:26+5:30

Padma Bhushan Award 2026 Bhagat Singh Koshyari: मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतामाता माझ्यासाठी सर्वकाही आहे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

bhagat singh koshyari first reaction and said padma bhushan award dedicated to rss and sangh volunteers | “पद्मभूषण पुरस्कार RSS, संघ स्वयंसेवकांना समर्पित”: भगतसिंह कोश्यारी; विरोधकांनाही सुनावले

“पद्मभूषण पुरस्कार RSS, संघ स्वयंसेवकांना समर्पित”: भगतसिंह कोश्यारी; विरोधकांनाही सुनावले

Padma Bhushan Award 2026 Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत भूमिका मांडली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करतो, असेही नमूद केले. 

पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले. मी टीव्ही पाहत नाही किंवा रेडिओ ऐकत नाही. लोकांकडून मला अभिनंदनाचे फोन आले. एका सामान्य कार्यकर्त्याला पद्म पुरस्कार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आभारी आहे. मला विश्वास आहे की आता आमचे संघ कार्यकर्ते समाजासाठी आणखी निस्वार्थपणे काम करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्याच्या स्वयंसेवकांना हा पुरस्कार समर्पित करत आहे, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे. 

भारतामाता माझ्यासाठी सर्वकाही आहे

सामान्यपणे जेव्हा एखाद्याला अशा पुरस्कार मिळतो, तेव्हा तो कोणालातरी समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली जाते. आज मी जे काही आहे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ स्वयंसेवकांच्या प्रेमामुळेच आहे. मी म्हणेन की हा सन्मान आपल्या प्रिय लोकांसाठी आहे. माझी कोणी प्रशंसा करावी किंवा निंदा करावी म्हणून मी काम करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतामाता माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्यासाठी मी काम करत असतो आणि काम करत राहणार. हे काम करत असताना कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करणार? असा प्रतिप्रश्न कोश्यारी यांनी केला. 

दरम्यान, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले. त्यांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. हा पुरस्कार संविधानाची हत्या करण्यासाठी दिला आहे का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. 

 

Web Title : कोश्यारी ने पद्म भूषण RSS को समर्पित किया, आलोचना के बीच पुरस्कार का बचाव किया।

Web Summary : भगत सिंह कोश्यारी ने अपना पद्म भूषण RSS को समर्पित किया, मोदी और मुर्मू को धन्यवाद दिया। उन्होंने अपनी कार्रवाई का बचाव करते हुए कहा कि वे भारत माता के लिए आलोचना की परवाह किए बिना काम करते हैं। संजय राउत ने पुरस्कार पर सवाल उठाया, इसे एमवीए सरकार के पतन से जोड़ा।

Web Title : Koshyari dedicates Padma Bhushan to RSS, defends award amid criticism.

Web Summary : Bhagat Singh Koshyari dedicated his Padma Bhushan to the RSS, thanking Modi and Murmu. He defended his actions, stating he works for Bharat Mata regardless of criticism. Sanjay Raut questioned the award, linking it to the fall of the MVA government.