सावधान! तुमचे मुल डेटिंग ॲपला बळी पडू शकते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:43 IST2025-10-06T07:43:36+5:302025-10-06T07:43:48+5:30
आरोपींमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, या घटनेने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत.

सावधान! तुमचे मुल डेटिंग ॲपला बळी पडू शकते
कोची : केवळ १६ वर्षांच्या मुलाला ऑनलाइन डेटिंग ॲपच्या माध्यमातून जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करणाऱ्या १४ जणांविरोधात केरळ पोलिसांनी कारवाई केली आहे. या आरोपींमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, या घटनेने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत.
मुलांचे वेगवेगळे आकर्षण
एर्नाकुलम जिल्ह्यातील डी-डीएडी केंद्राचे समन्वयक म्हणाले, “मुलगे प्रामुख्याने ऑनलाइन गेम्सच्या आहारी जातात, तर मुली सोशल मीडियाकडे आकर्षित होतात.” मार्च २०२३ ते जुलै २०२५ या काळात या केंद्रांमध्ये १,९९२ प्रकरणे नोंदली गेली. त्यापैकी ५७१ ऑनलाइन गेमच्या व्यसनाशी संबंधित होती.
४१ मुलांची आत्महत्या
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी विधानसभेत माहिती दिली की, जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान मोबाइल व इंटरनेटच्या गैरवापरामुळे तब्बल ४१ मुलांनी आत्महत्या केली.
अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू चिल्ड्रन या मोहिमेत राज्यातील १,२२७ शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. तसेच १,०१२ शाळांमध्ये मानसशास्त्रीय समुपदेशक नेमण्यात आले आहेत.