शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! टोल थकवला तर तुम्हाला गाडी विकता येणार नाही! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:17 IST

टोलचोरी करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी सरकार कार्यशील

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महामार्गांवरून विनाअडथळा प्रवास करण्यासाठी केंद्र सरकार ‘विनाअडथळा’ टोलिंग यंत्रणा लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, ही सुविधा देतानाच नियम कठोर करण्याचे ठरवले आहे. आता तुमच्या वाहनावर टोल थकबाकी असेल, तर तुम्हाला वाहन विक्री करता येणार नाही किंवा त्याचे फिटनेस सर्टिफिकेटही मिळणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटर वाहन नियम, २०२६’मध्ये सुधारणा केली असून, तशी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या नवीन नियमांमुळे टोल चोरी करणाऱ्यांना चाप बसणार असून महामार्गावरील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन अधिक प्रभावी होणार आहे.

बॅरियरमुक्त प्रवासाचा मार्ग मोकळा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०२६ मध्ये ‘अडथळेमुक्त’ टोलिंगला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सध्या टोल वसुलीसाठी होणारा १५ टक्के खर्च या नवीन तंत्रज्ञानामुळे केवळ ३ टक्क्यांवर येईल. यामध्ये ‘ऑटोमॅटिक नंबरप्लेट रिकग्निशन’ आणि फास्टटॅगच्या माध्यमातून धावत्या वाहनाचा टोल कापला जाईल. टोल प्लाझावर थांबण्याची गरज नसल्याने इंधन आणि वेळेची मोठी बचत होईल.

कारवाईचा बडगा

एखाद्या वाहनधारकाने टोल भरला नाही, तर त्याला ई-नोटीस पाठवली जाईल. तरीही पैसे न भरल्यास त्याचे फास्टटॅग निलंबित केले जाऊ शकते. दंड आकारले जाऊ शकतात.

नवीन नियमावलीत काय आहे?

एनओसी मिळण्यात अडथळे

वाहन ट्रान्सफर, फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण किंवा परमिट हवे असेल तर टोल थकबाकी नसल्याचे ‘एनओसी’ अनिवार्य.

फॉर्म २८ मध्ये बदल

वाहन विक्री किंवा हस्तांतरणासाठी आवश्यक ‘फॉर्म २८’मध्ये आता टोल थकबाकीचा रकाना जोडण्यात आला आहे.

डिजिटल ट्रॅकिंग

फास्टटॅगमधून पैसे कापले नसतील, तर ती रक्कम ‘थकबाकी’ गणली जाईल. वाहनाच्या प्रवासाची नोंद ठेवली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : No Vehicle Sale if Toll Due: Central Government's Strict Rule

Web Summary : Central government implements barrier-free tolling, linking dues to vehicle sales and fitness certificates. Toll defaulters face e-notices, FASTag suspension, and penalties. NOC needed for vehicle transfers, with digital tracking of unpaid tolls ensuring effective electronic toll collection.
टॅग्स :tollplazaटोलनाकाcarकार