सावधान! गरम पाण्याच्या बादलीने घेतला ५ वर्षांच्या चिमुरडीचा जीव; खेळता-खेळता रॉडला हात लागला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:32 IST2026-02-13T13:31:05+5:302026-02-13T13:32:00+5:30

घरात पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिक इमर्शन रॉडचा धक्का लागून एका ५ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

Beware! A bucket of hot water took the life of a 5-year-old girl; While playing, she touched the rod and... | सावधान! गरम पाण्याच्या बादलीने घेतला ५ वर्षांच्या चिमुरडीचा जीव; खेळता-खेळता रॉडला हात लागला अन्...

AI Generated Image

आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीची किंवा दुर्लक्षाची किती मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात आला आहे. घरात पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिक इमर्शन रॉडचा धक्का लागून एका ५ वर्षांच्या चिमुरडीचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नेमकी घटना काय?

बेगमगंज येथील हदईपूर मोहल्ल्यात ही हृदयद्रावक घटना घडली. ५ वर्षीय स्वाती आपल्या घरात खेळत होती. दरम्यान, तिच्या आईने अंघोळीसाठी पाणी गरम करायला बादलीत इलेक्ट्रिक इमर्शन रॉड लावला होता. रॉडचे बटण सुरू होते आणि बादलीत वीजप्रवाह उतरला होता. खेळता-खेळता स्वातीचे लक्ष त्या बादलीकडे गेले. पाणी दिसल्यावर कदाचित हात धुण्यासाठी किंवा पाण्याशी खेळण्यासाठी ती बादली जवळ गेली आणि तिचा हात सुरू असलेल्या रॉडला लागला.

आईचा आक्रोश अन् डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ

जोराचा विजेचा झटका बसताच स्वाती ओरडली. मुलीचा आवाज ऐकून आईने तातडीने धाव घेत विजेचे बटण बंद केले. स्वातीला बेशुद्ध अवस्थेत पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. एका हसत्या-खेळत्या चिमुरडीचा असा अंत झाल्याने कुटुंबावर डोंगर कोसळला आहे.

स्वस्त रॉड आणि निष्काळजीपणा पडतोय महागात

इमर्शन रॉड हा पाणी गरम करण्याचा स्वस्त पर्याय असला तरी, तो मृत्यूचा सापळा ठरू शकतो. अनेकदा रॉडमध्ये अर्थिंग नसल्याने किंवा वायर उघडी असल्याने संपूर्ण बादलीत करंट उतरतो. लहान मुले अशा उपकरणांच्या धोक्यापासून अनभिज्ञ असतात, त्यामुळे अशा वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते.

Web Title : मध्य प्रदेश: गरम पानी की रॉड से करंट लगने से 5 वर्षीय बच्ची की मौत

Web Summary : मध्य प्रदेश में पानी गरम करने की रॉड से करंट लगने से एक पांच वर्षीय बच्ची की दर्दनाक मौत हो गई। खेलते समय रॉड को छूने से उसे झटका लगा। घटना लापरवाही और असुरक्षित उपकरणों के खतरे को दर्शाती है।

Web Title : Tragedy: Immersion rod electrocutes 5-year-old girl in Madhya Pradesh.

Web Summary : A five-year-old girl in Madhya Pradesh died after being electrocuted by an immersion rod. Playing near a bucket with a live rod, she touched it, suffering a fatal shock. This highlights the dangers of faulty immersion rods and parental negligence.