'Betrayal Day'; fourth anniversary of Modi government by Congress Celebration | 'विश्वासघात दिवस'; मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचं आगळं सेलिब्रेशन

'विश्वासघात दिवस'; मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचं आगळं सेलिब्रेशन

पाटणा- 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. याच निमित्तानं काँग्रेस विश्वासघात दिवस साजरा करणार आहे. नरेंद्र मोदी सरकारचा 26 मे 2018 रोजी स्वतःच्या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून काँग्रेसनं विश्वासघात दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच दिवशी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करणार आहे. तसेच मोदींनी या चार वर्षांत लोकांना खोटी आश्वासनं देऊन कशा प्रकारे फसवणूक केली हेसुद्धा उघड करण्याचा निर्धार केला आहे. शनिवारी सर्व राज्यांतील राजधानी आणि जिल्हा स्तरावर हे विरोध प्रदर्शन केलं जाणार आहे. या विरोध प्रदर्शनात भाजपाला महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मोदींनी चार वर्षांना लोकांना खोट्या आश्वासनांशिवाय काहीही दिलेलं नाही, अशी टीका बिहार काँग्रेसचे प्रभारी कौकब कादरी यांनी केली आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वी सत्तेवर येण्यासाठी मोदींनी खोटी आश्वासने दिल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली होती. मोदी सरकार 2014मध्ये सत्तेवर आले. पण राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यांना यावरून फक्त सत्तेची लालसा असल्याचे दिसते. हिंदू राष्ट्र त्यांना नकोच आहे. देशातील हिंदूंची फसवणूक झाली, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले होते. मोदी सरकार जम्मू-काश्मीरमधील तिढा, काश्मीर पंडितांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर तोडगा काढेल अशी हिंदुत्ववादी संघटनांना आशा होती. पण जम्मूत पीडीपीसोबत भाजपने युती केली आणि तिथेही भाजपला फक्त सत्ताच हवी असल्याचे दिसते, असे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. आमचे सरकार केंद्रात असल्याचे वाटत नाही. राम मंदिराचे काम सुरू झाले असते तर भारताला हिंदूराष्ट्र म्हणता आले असते. हिंदू राष्ट्रांमध्ये अन्य धर्मांना स्थान नाही. आमच्यासाठी हिंदू धर्मच महत्त्वाचा आहे, असे साध्वी सरस्वती यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Betrayal Day'; fourth anniversary of Modi government by Congress Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.