शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

कुत्र्याला मडक्यातून बाहेर काढण्यासाठी 15 पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 11:04 AM

मडक्यामध्ये अडकलेल्या कुत्र्याला बाहेर काढताना पोलिसांना फार काळजी आणि दक्षता घ्यावी लागली.

ठळक मुद्देमडक्यात काहीतरी खायाला मिळेल म्हणून मडक्याजवळ गेलेला कुत्रा मडक्यात अडकला.बंगळुरूच्या 15 पोलिसांनी आपली ड्युटी सांभाळत या कुत्र्याला जीवनदान दिलं आहे.त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहेत.

बंगळुरू : कुत्र्याचं डोकं एका मडक्यात अडकल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी तब्बल 15 पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. कसलीही इजा न होता कुत्र्याचं डोकं सुखरुप बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी थोडीशी शक्कल लढविली आणि कुत्र्याची मडक्यातून सुटका केली. बंगळुरूत ही घटना घडली असून आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी याबाबत ट्विट करून सांगितलं आहे.

बंगळुरू पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या कौतुकाच्या पात्रतेस ठरलेले आहेत. केवळ माणसांच्याच समस्या जाणून न घेता मुक्या प्राण्यांनाही त्यांनी कित्येकदा मदत केलेली आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आलाय. दोन दिवसांपूर्वी बंगळुरूत एका कुत्र्याचं डोकं प्लास्टिकच्या मडक्यात अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुत्र्याचं तोंड अडकल्याने त्याला धड श्वासही घेता येत नव्हता. तो जिवंत राहावा याकरता त्याने श्वास घेणं गरजेचं होतं, त्यामुळे पोलिसांनी सगळ्यात आधी त्या मडक्याला थोडीशी छिद्र पाडली, जेणेकरून कुत्र्याला निदान श्वासतरी घेता येईल.

आणखी वाचा - नागालँडची अंडर-19 टीम फक्त दोन धावांवर ऑलआऊट, नऊ जण शून्यावर बाद

आणखी वाचा - तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे

मडक सहज फुटण्यासारखं होतं, मात्र मडकं फोडताना काळजी घ्यावी लागली कारण जरातरी हयगय झाली असती तर कुत्र्याला इजा पोहोचली असती. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न करून अगदी सावकाशपणे हे मडकं फोडण्यात आलं. पण हा कुत्रा इतका बिथरला होता की मडक्यातून आपली सुटका होताच त्याने धूम ठोकली, त्यामुळे त्या कुत्र्याचा फोटोच काढता न आल्याची खंत अभिषेक गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्यक्त केलीय. 

15 पोलिसांनी आपली ड्युटी सांभाळत या कुत्र्याला जीवनदान दिलं आहे. आयपीएस अभिषेक गोयल यांनी याबाबत ट्वीट करताच अनेक नेटिझन्सने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांविषयी देशभरातून उमटत असलेल्या प्रतिक्रिया पाहता पोलीसही माणूसच आहेत, त्यांच्यातही माणुसकी शिल्लक आहे, अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहे.

अशाच इतर चित्र-विचित्र बातम्यासाठी येथे क्लिक करा.

मडक्यात काहीतरी खायाला मिळेल या आशेने मडक्याजवळ गेलेला कुत्रा स्वतःच मडक्यात अडकला. त्याला श्वासही घेता येत नसल्याने कदाचित त्याचा जीवही गेला असता, मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे कुत्रा वाचला आहे, त्यामुळे पोलिसांचे कौतुक व्हायलाच हवे, असंही काही नेटिझन्स म्हणाले.

टॅग्स :BengaluruबेंगळूरPoliceपोलिसdogकुत्रा