Video : बंगळुरूमधील एरो इंडिया शो दरम्यान भीषण आग, 100 कार जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 14:32 IST2019-02-23T13:47:51+5:302019-02-23T14:32:59+5:30

बंगळुरूतील एरो इंडिया शोदरम्यान शनिवारी (23 फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Bengaluru Fire breaks out at car parking area near the venue of AeroIndia2019 | Video : बंगळुरूमधील एरो इंडिया शो दरम्यान भीषण आग, 100 कार जळून खाक

Video : बंगळुरूमधील एरो इंडिया शो दरम्यान भीषण आग, 100 कार जळून खाक

ठळक मुद्देबंगळुरूतील एरो इंडिया शोदरम्यान शनिवारी (23 फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंग परिसरात लागलेल्या आगीमध्ये जवळपास 80 ते 100 गाड्या जळाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बंगळुरू - बंगळुरूतील एरो इंडिया शोदरम्यान शनिवारी (23 फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. 

पार्किंग परिसरात लागलेल्या आगीमध्ये जवळपास 80 ते 100 गाड्या जळाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बंगळुरूमध्ये  एरो इंडिया शोचे आयोजन करण्यात आले आहे. गाड्या पार्किंग करण्यात आलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवताच्या पेंढ्या होत्या. या गवताच्या पेंढ्याला आग लागल्याने गाड्यांना आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 






Web Title: Bengaluru Fire breaks out at car parking area near the venue of AeroIndia2019