शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरु एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, १० ठार

By admin | Updated: February 13, 2015 12:07 IST

बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १३ - बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

शुक्रवारी सकाळी बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेस साडे सहाच्या सुमारास बंगळुरुहून एर्नाकुलमच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडे सातच्या सुमारास कर्नाटक - तामिळनाडू सीमेवरील एनकेल येथे एक्सप्रेसचे इंजिनसह नऊ डबे रेल्वे रुळावरुन घसरले. अपघातात काही डबे एकमेकांवर चढल्याने प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. या अपघातात आत्तापर्यंत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  दरम्यान, मदतकार्याला सुरुवात झाली असून १८ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाला आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

'सकाळी गाडीत बसल्यावर अनेक जण झोपी गेले होते. मात्र तासाभरानंतर आम्हाला जोरदार आवाज आला. आम्ही कसेबसे ट्रेनच्या बाहेर पडलो आणि नेमके काय झाले ते बघितले. डी ८ आणि डी ९ हे डबे एकमेकांवर चढले होते. या दोन डब्यांमध्येच जास्त प्रवासी अडकले असून सर्वाधिक नुकसान या दोन डब्यांचेच झाले आहे अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.