'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:49 IST2025-04-25T20:48:52+5:302025-04-25T20:49:16+5:30
"हिंसाचार पसरवण्यासाठी धर्माचा वापर शस्त्र म्हणून कशा पद्धतीने केला जतो हे मी बघितले आहे. हे काश्मीरात अनेक वेळा घडले आहे. आता मी हे सहन करू शकत नाही."

'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण दशभरात संतापाची लाट आहे. गेल्या मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात, बैसरनच्या सुंदर टेकड्यांचा आनंद घेत असलेल्या २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून निर्दयीपणे गोळ्या घातल्या. या घटनेनंतर, देशाच्या कानाकोपऱ्यातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. दहशतवाद्यांचा निषेध केला जात आहे. यातच, पश्चिम बंगालमधील एका शाळेतील शिक्षिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या शिक्षकानेइस्लाम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. साबीर हुसेन असे या शिक्षकाचे नाव आहे.
महत्वाचे म्हणजे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे व्यथित झालेल्या बदुरिया येथील साबीर हुसेन यांनी इस्लाम सोडण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यूज18 शी बोलताना साबीर हुसेन म्हणाले, "हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर केला जातो. हे योग्य नाही. मी कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. हिंसाचार पसरवण्यासाठी धर्माचा वापर शस्त्र म्हणून कशा पद्धतीने केला जतो हे मी बघितले आहे. हे काश्मीरात अनेक वेळा घडले आहे. आता मी हे सहन करू शकत नाही."
ते पुढे म्हणाले, "कोणत्याही धर्मामुळे नाही, तर मी केवळ एक माणूस म्हणून ओळखला जावा, अशी माझी इच्छा आहे. यामुळेच मी न्यायालयात अर्ज करण्यासाठी आलो आहे." साबीर पुढे म्हणाले, “पहलगामसारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा गैरवापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणे कसे योग्य असू शकते? हे मला अत्यंत व्यथित करते.”
सद्य स्थितीवर भाष्य करताना हुसेन म्हणाले, "आजकाल सर्व काही धर्माभोवतीच फिरत असल्याचे दिसते. मला अशा जगात राहायचे नाही. आपला हा निर्णय व्यैयक्तिक आहे. आपल्या पत्नीने आणि मुलांनी कोणता मार्ग निवडायचा, याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.