बंगाली मॉडेल मंजुषाची आत्महत्या, 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:10 IST2022-05-28T11:09:53+5:302022-05-28T11:10:35+5:30

पंधरा दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले

Bengali model Manjusha Niyogi committed suicide by hanging herself | बंगाली मॉडेल मंजुषाची आत्महत्या, 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले

बंगाली मॉडेल मंजुषाची आत्महत्या, 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले

कोलकाता : मंजुषा नियोगी या बंगाली माॅडेल व अभिनेत्रीने कोलकाता येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या दोन दिवस आधी मंजुषाची मैत्रीण बिदिशा डे मुजुमदार या अभिनेत्रीनेदेखील आत्महत्या केली होती. गेल्या पंधरा दिवसांत बंगाली चित्रपटसृष्टीतील तीन अभिनेत्रींनी आपले आयुष्य संपविले आहे. 

कोलकातामधील पाटुली भागात राहत असलेली मंजुषा नियोगी ही आपली मैत्रीण बिदिशा डे मुजुमदार हिच्या आत्महत्येने अस्वस्थ होती. तिला खूप निराशा आली होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी, असे मंजुषाच्या आईने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मंजूषाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. 
शुक्रवारी सकाळी मंजुषा आपल्या खोलीबाहेर आली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी तिला कॉल केला; पण ती फोन उचलत नसल्याने ते तिच्या खोलीत गेले. तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत मंजुषाचा मृतदेह सापडला. कांची या टीव्ही मालिकेत तिने नुकतीच नर्सची भूमिका केली होती. (वृत्तसंस्था)

बिदिशाचे जोडीदाराशी झाले मतभेद
बिदिशा डे मुजुमदार ही मॉडेल व अभिनेत्री मेकअप तसेच इतर गोष्टींच्या जाहिरातींमधील प्रसिद्ध चेहरा होता. कोलकाता येथील डमडम भागातील एका घरात तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी संध्याकाळी आढळून आला होता. बिदिशाचे तिच्या जोडीदाराशी काही मतभेद झाले होते. त्यामुळे ती गेले काही दिवस अस्वस्थ होती. 

लिव्ह-इन-पार्टनरशी झाले भांडण
दि. १५ मे रोजी पल्लवी डे या अभिनेत्री व मॉडेलचा मृतदेह तिच्या कोल फ्लॅटमध्ये सापडला होता. पल्लवीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पल्लवीचा लिव्ह-इन-पार्टनर साग्निक चक्रवर्ती याला पोलिसांनी अटक केली. पल्लवीची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. साग्निक हा विवाहित होता. मात्र तो सध्या पल्लवीसोबत राहत होता. या दोघांमध्ये सतत भांडणे होत असत, असे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Bengali model Manjusha Niyogi committed suicide by hanging herself