Bengal BJP MLA Debendra Nath Ray Found Hanging In Market, Party Alleges Murder | धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात भाजपा आमदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हेमताबादमधले भाजपाचे आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह एका दुकानाच्या बाहेर मोकळ्या जागेत लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर भाजपानं त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. देवेंद्र नाथ रे गेल्या वर्षीच सीपीएममधून भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. 

ज्या बाजारपेठेत आमदार देवेंद्र नाथ रे हे लटकलेले आढळले, ते ठिकाण त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, काही लोक पहाटे 1 वाजता घरी आले आणि त्यांना बोलावून घेऊन गेले. त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी आमदार कुटुंबीयांनी केली आहे. आज सकाळी स्थानिक रहिवाशांना  देवेंद्र नाथ रे यांचा लटकलेला मृतदेह आढळून आला आणि त्यांनी लागलीच पोलिसांना बोलावले.

आमदाराची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या हत्या करण्याच्या घटनांचा कोणताही अंत नाही. टीएमसी सोडून गेलेल्या भाजपाच्या आमदारांची हत्या झाली आहे. ते भाजपामध्ये सामील झाले होते म्हणून त्यांची हत्या केली का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा

हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन

रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख

टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bengal BJP MLA Debendra Nath Ray Found Hanging In Market, Party Alleges Murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.