today petrol diesel price in india diesel price up by 11 paise check latest rates | टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव समसमान पातळीवर आले आहेत, तर कधी डिझेल पेट्रोलपेक्षाही जास्त भाव खात आहे. गेल्या महिन्यातही डिझेलच्या दरानं पेट्रोलच्या दराला मागे सोडलं होतं, आज पुन्हा एकदा नवी दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे. ऑयल मार्केटिंग कंपनी (ओएमसी) ने सोमवारच्या डिझेलच्या दरात 11 पैसे प्रतिलिटरच्या वाढ केली आहे. या वाढीनंतरच्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये डिझेलच्या भाव वाढला आहे. दिल्लीत एक लीटर डिझेलचा दर 81.05 रुपये प्रति लीटरवर आला आहे. पेट्रोलचे भावामध्ये कोणत्याही वाढीची नोंद झालेली नाही. पेट्रोलची किंमत 80.43 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. त्यानुसार रविवारी तेल कंपन्या डिझेलच्या दरात 16 पैसे प्रति लीटर वाढ केली.

प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगळ्या स्थानिक विक्रीची कर किंवा मूल्य वर्धित कर (व्हॅट) लावला जातो. या कारणास्तव राज्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.  पेट्रोलच्या दरात 29 जूनला बदल झाला होता. गेल्या 5 आठवड्यांत डिझेलचा दर 25 वेळा आणि पेट्रोलचा दर 21 वेळा वाढला आहे. 7 जूनपासून आतापर्यंत पेट्रोल 9.17 रुपये आणि डिझेल 11.66 रुपयांनी महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून अबकारी कर तसेच व्हॅट यांची आकारणी केली जाते. त्यामुळे इंधनाच्या जाहीर झालेल्या दरांपेक्षा प्रत्येक राज्यामध्ये अधिक रक्कम ग्राहकांना मोजावी लागते. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणण्याची मागणी केली जात असली तरी अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे. 

रोज सकाळी 6 वाजता बदलतात किमती
दर दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलल्या जातात. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू होतात. पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि इतर वस्तू जोडल्या गेल्यानंतर हे दर जवळजवळ दुप्पट होतात.
दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 81.05 रुपये लिटर
मुंबई- पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 79.27 रुपये लीटर आहे.
कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 76.17 रुपये लीटर आहे.
चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल 78.11 रुपये लीटर आहे.
 नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये आणि डिझेल 73.0 रुपये लीटर आहे.
गुरुग्राम- पेट्रोल 78.64 रुपये आणि डिझेल 73.19 रुपये लीटर आहे.
लखनऊ- पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.91 रुपये लीटर आहे.
पाटणा- पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 77.89 रुपये लीटर आहे.

जाणून घ्या, आपल्या शहरातील आजचे दर
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता ते अद्ययावत केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहिती करता येऊ शकतात (दररोज डिझेल आणि पेट्रोलची किंमत कशी तपासायची). इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP लिहून 9224992249 वर मेसेज पाठवल्यानंतर आजच्या दराची माहिती मिळू शकते. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 वर पाठवल्यास माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याच वेळी, एचपीसीएलचे ग्राहक HPPrice लिहून आणि 9222201122 क्रमांकावर मेसेज पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: today petrol diesel price in india diesel price up by 11 paise check latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.