शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताच्या पेंटिंगने प्रेयसी खूष, पण आली बंदी; तामिळनाडूत सुरक्षिततेसाठी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:05 IST

चेन्नईतील गणेशन या २० वर्षीय युवकाने १० डिसेंबर रोजी वाढदिवसाला प्रेयसीला आगळी भेट दिली.

चेन्नई  : शरीरातील रक्त काढून त्याद्वारे चित्र काढण्यावर तामिळनाडू सरकारने बंदी घातली आहे. अशा प्रकारची  चित्रे काढण्याच्या प्रकारांमध्ये या राज्यात वाढ झाली होती. त्यामुळे मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सदर निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले.

चेन्नईतील गणेशन या २० वर्षीय युवकाने १० डिसेंबर रोजी वाढदिवसाला प्रेयसीला आगळी भेट दिली. त्यासाठी तो एका ब्लड आर्ट स्टुडिओत गेला होता. तिथे त्याच्या शरीरातील रक्त काढण्यात आले. या रक्ताने त्याच्या प्रेयसीचे चित्र चित्रकाराने काढले. गणेशनने ते चित्र भेट देताच प्रेयसी खूश झाली. मात्र, ही घटना समोर येताच तामिळनाडूत खळबळ माजली. (वृत्तसंस्था)

एकाच नीडलचा वापर अनेक जणांसाठी

शरीरातून रक्त घेण्याची एक शास्त्रीय पद्धत असते. त्याचा अवलंब ब्लड आर्ट स्टुडिओमध्ये होत नाही. इतकेच नव्हे एकच नीडल अनेक लोकांच्या शरीरातील रक्त काढून घेण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी आदी आजार होण्याची शक्यता असते.

चुकीच्या पद्धतीने रक्त घेतले जाते

एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून रक्ताचा नमुना घेण्याची परवानगी फक्त प्रयोगशाळेतील प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, नर्स, डॉक्टर आदींना असते. चुकीच्या पद्धतीने शरीरातून रक्त काढण्यामुळे माणसाच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

गेल्या २८ डिसेंबर रोजी त्या राज्याचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांनी चेन्नईतील एका ब्लड आर्ट स्टुडिओला अचानक भेट दिली. तिथे त्यांना रक्त भरलेल्या काही बाटल्या व नीडल्स आढळून आल्या. मानवी आरोग्यासाठी धोकादायक असलेले ते दृश्य पाहून सुब्रमण्यम यांनी राज्यातील ब्लड आर्ट स्टुडिओवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

कडक कारवाईचा इशारा : सुब्रमण्यम

आपल्या रक्ताद्वारे चित्र काढणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कडक शिक्षा केली जाईल, असेही तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांनी जाहीर केले. त्यांनी सांगितले की, रक्ताद्वारे चित्र काढणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. रक्तदान हे पवित्र कार्य आहे. मात्र, अन्य कारणांसाठी शरीरातील रक्त काढणे अयोग्य आहे. एखाद्याविषयी आदर किंवा प्रेमभाव दर्शविण्यासाठी अनेक उत्तम मार्ग उपलब्ध आहेत. 

टॅग्स :paintingचित्रकलाChennaiचेन्नई