कर्नाटकातील चार रेल्वे स्थानकांची नावे बदलली; कोणती स्थानके अन् बदलले नाव काय.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:51 IST2025-11-14T15:48:52+5:302025-11-14T15:51:44+5:30
प्रवाशांना आरक्षणावेळी ठेवावी लागेल नोंद

कर्नाटकातील चार रेल्वे स्थानकांची नावे बदलली; कोणती स्थानके अन् बदलले नाव काय.. जाणून घ्या
सांगली : कर्नाटकातील बेळगावी, विजयपूर, शिमोगा व बिदर रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. प्रवाशांना तिकीट आरक्षण करतेवेळी या स्थानकांची नावे नव्या संदर्भासह लिहावी लागणार आहेत.
रेल्वेच्या हुबळी विभागातील काही स्थानकांची नावे बदलण्याच्या प्रस्तावाला कर्नाटक शासनाने मंजुरी दिली आहे. तो आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अंतिम मंजुरी व अधिसूचनेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यानुसार बेळगावी स्थानकाचे नवे नाव ‘शिवबसव महास्वामीजी रेल्वेस्थानक’ असे असेल. विजयपूर स्थानकाचे नवे नाव ‘ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी स्थानक’ होईल.
बिदर स्थानकाचे नवे नाव ‘चन्नबसव पत्तदेवरू स्थानक’ होईल. शिवमोगा तथा शिमोगा स्थानकाचे सध्याचे सुरगोंदनकोप्पा स्थानक हे नाव बदलून ‘भायगड स्थानक’ होणार आहे. या स्थानकांची नावे बदलली, तरी त्यांचे कोड मात्र कायम राहणार आहेत.