शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 09:27 IST

येथे ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे...

जम्मू-कश्मीरमधील बडगाम आणि नगरोटा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण जबरदस्त तापल्याचे दिसत आहे. नेशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजप नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांनी 2024 मध्ये भाजपाशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हटले होते.

शर्मा यांनी दावा केला होता की, उमर अब्दुल्ला यांनी विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा केली होती. एवढेच   नाही तर, जर हे खोटे असेल तर, उमर अब्दुल्ला यांनी कोणत्याही मशिदीत किंवा धार्मिक स्थळी जाऊन, आपण भाजप सोबत युतीचा प्रयत्न केला नाही, अशी शपथ घ्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले होते. शर्मा यांच्या या आरोपांनंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या माध्यमाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी लिहिले आहे की, "मी कुराणची शपथ घेऊन सांगतो की, मी 2024 मध्ये राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी अथवा कोणत्याही राजकीय कारणासाठी भाजपशी युती करण्याचा प्रयत्न केलेला नाही.” त्यांनी भाजपावर जाणूनबुजून खोटे पसरवून, जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे.

महत्वाचे म्हणजे, उमर अब्दुल्ला यांनी 2024 मध्ये गंदेरबल आणि बडगाम या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढली होती आणि दोन्ही ठिकाणांवर त्यांचा विजय झाला होता. यानंतर, त्यांनी बडगाम जागेचा राजीनामा दिला. यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. तर, नगरोटा मतदारसंघाचे भाजप आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनानंतर ती जागाही रिक्त झाली होती. येथे ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Omar Abdullah Denies BJP Alliance Attempt, Takes Quran Oath Amid Political Heat

Web Summary : Amidst J&K by-election heat, Omar Abdullah denies BJP alliance attempts in 2024, taking a Quran oath. He accuses BJP of spreading falsehoods.
टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024Politicsराजकारण