IVF Cost: आई-बाप होणे महागले! आयव्हीएफ उपचारांचा कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा; घ्यावे लागते कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:59 IST2025-12-11T11:58:08+5:302025-12-11T11:59:55+5:30
IVF Treatment: अहवालानुसार, सरकारी रुग्णालयांत आयव्हीएफ उपचारांसाठी सरासरी १.१० लाख रुपये खर्च येतो. खासगी रुग्णालयात हा खर्च २.३७ लाख रुपयांपर्यंत जातो.

IVF Cost: आई-बाप होणे महागले! आयव्हीएफ उपचारांचा कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा; घ्यावे लागते कर्ज
नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या वंध्यत्वाच्या समस्येवर उपचार घेणे हे अनेक जोडप्यांसाठी भावनात्मक संघर्षासोबतच एक मोठा आर्थिक संघर्ष बनला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या एका अहवालातून ही गंभीर माहिती समोर आली आहे, ज्यामुळे उपचारांचा खर्च सामान्य कुटुंबाची कंबर मोडत आहे.
अहवालानुसार, सरकारी रुग्णालयांत आयव्हीएफ उपचारांसाठी सरासरी १.१० लाख रुपये खर्च येतो. खासगी रुग्णालयात हा खर्च २.३७ लाख रुपयांपर्यंत जातो.
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
आर्थिक व मानसिक ताण
आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या १० पैकी ९ जोडप्यांना उपचारासाठी मोठा आर्थिक दबाव सहन करावा लागतो. या प्रचंड खर्चामुळे सुमारे ५०% कुटुंबांना उपचारासाठी कर्ज घ्यावे लागतात. या काळात महिलांना शारीरिक वेदना, मानसिक तणाव आणि ‘अपेक्षा पूर्ण न होण्याची भीती’ सतत सतावत असते.
धोरणकर्त्यांना आवाहन
या गंभीर परिस्थितीमुळे, धोरणे बनवणाऱ्या लोकांनी सुलभ, सहज उपलब्ध आणि संवेदनशील उपचार सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून आई-वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांना कर्जाचा बोजा सहन करावा लागू नये.
२.७५
कोटी जण देशात वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त
१६.८%
मूल नसणाऱ्या जोडप्यांना उपचाराची गरज.
८%
जोडप्यांना आयव्हीएफ सारख्या प्रगत उपचारांची गरज.