शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

आरक्षणाच्या खिरापतींमुळे जातीय संघर्ष अटळ- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:24 IST

आरक्षणाच्या नावाने दुफळी माजवण्याचे काम भाजपा सरकार करीत असून, त्यामुळे जाती,जातींमध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणमध्ये रविवारी व्यक्त केली. 

कल्याण : विकासाचा आराखडा देऊ शकत नाही म्हणून आरक्षणाची खिरापत वाटण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे. परंतु आरक्षणाच्या नावाने दुफळी माजवण्याचे काम भाजपा सरकार करीत असून, त्यामुळे जाती,जातींमध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणमध्ये रविवारी व्यक्त केली. येथील एपीएमसी ग्राउंडवर वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा झाली. आंबेडकर यांनी भाजपा-शिवसेना सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, आ. वारिस पठाण उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, भाजपाने संविधानाच्या माध्यमातून केंद्रात सत्ता मिळवली. जोपर्यंत बहुमत नव्हते तोपर्यंत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहकाराची भाषा होती. परंतु २०१४ मध्ये बहुमत मिळताच त्यांनी खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली. याच आरएसएसने १५ आॅगस्ट हा काळा दिवस साजरा केला आहे. तिरंग्याला न मानणाऱ्यांनी २०१४ ला नाक मुठीत धरून नागपूर रेशमबागेत पहिल्यांदा तिरंगा फडकवला. ज्यांनी देशाचा तिरंगा मानला नाही, त्यांच्यावर अद्याप का कारवाई झाली नाही? आजही काँग्रेस याचे उत्तरदेत नाही. आरएसएस ही देशातील एक आतंकवादी संघटना आहे. आरएसएस प्रमुख शस्त्रांची पुजा करतात. देशात पोलीस, लष्कर सक्षम असताना शस्त्रांची गरज काय? आरएसएस ही एका विशिष्ठ समाजाची संघटना असली तरी त्यांच्यासोबत संपूर्ण समाज नाही, ही चांगली गोष्ट आहे. अमेरिका, युरोपमध्ये गेलेले बुद्धीजीवी आरएसएसभक्त आहेत. मग आरएसएसने सांस्कृतिक राष्ट्रवाद काय असतो, तो समजावून सांगावा. आम्ही या देशातील संवैधानिक आणि भौगोलिक राष्ट्रवाद सांगतो. आमचे आव्हान स्वीकारा. पण ते कधीही आव्हान स्वीकारणार नाही. कारण यांचा राष्ट्रवाद म्हणजे मनुवाद आहे. आरएसएसची संस्कृती द्वेषाची आणि एकमेकांना समान न बघणारी आहे, असेही ते म्हणाले.सर्वांनी एकत्र या : असदुद्दीन ओवैसीनरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस न्याय देतील या भ्रमात राहू नका. ७९ वर्षे ज्यांनी आपल्याला रडविले, त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ओवैसी म्हणाले. २८० जागा मिळवूनही पंतप्रधान रोहित वेमुलाचा मृत्यू रोखू शकले नसल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीreservationआरक्षणBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर