शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दिल्ली मेट्रोची कमाल; 2003 पासून 99 टक्के फेऱ्या वेळेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 3:41 PM

दिल्ली मेट्रोने आपले कार्यक्षेत्र वाढवले असून त्यावरील फेऱ्याही वाढल्या आहेत. तरिही मेट्रोच्या बहुतांश फेऱ्या वेळेवर होत आहेत.

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमधीलमेट्रो रेल्वेने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये दिल्लीमधील मेट्रोचे जाळे मोठे होत चालले आहे. त्यातच नव्या मार्गांचे बांधकामही सुरु झाले आहे. मात्र तरिही मेट्रोच्या वक्तशीरपणामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. 2003 पासून 2018 च्या मे महिन्यापर्यंत दिल्ली मेट्रो 99 टक्के वक्तशीर असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.साठ सेकंदांपेक्षा एखाद्या फेरीला उशीर झाल्यास तिची नोंद घेतली जाते. 2014 साली 18.59 लाख फेऱ्या झाल्या त्यामध्ये 1,213 फेऱ्यांना उशिर झाला. 2015 साली 19.41 लाख फेऱ्या झाल्या, त्यातील 1115 फेऱ्या उशिराने धावल्या. 2016 साली 21.01 लाख फेऱ्यांपैकी  1326 फेऱ्यांना उशिर झाला तर 2018च्या मे महिन्यापर्यंत 99.86 टक्के फेऱ्या वेळेवर धावल्या.  दिल्ली मेट्रोने आपले कार्यक्षेत्र वाढवले असून त्यावरील फेऱ्याही वाढल्या आहेत. तरिही मेट्रोच्या फेऱ्या वेळेवर होत आहेत.वेळापत्रकाप्रमाणे दिल्ली मेट्रोरेल कार्पोरेशन किती फेऱ्या रद्द झाल्याचे याचीही नोंद ठेवते. 2018 च्या मे महिन्यापर्यंत 377 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 2013 साली 709 फेऱ्या, 2014मध्ये 536 फेऱ्या, 2015 साली 1084 फेऱ्या, 2016 साली 692 तर 2017 साली 783 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ब्लू लाइन आणि यलो लाइनवर सरासरी दोन मिनिटे 40 सेकंदांनी एक ट्रेन धावते तर रेड़ लाइनवर तीन मिनिटे 6 सेकंदांनी एक मेट्रो धावते.

टॅग्स :Metroमेट्रोNew Delhiनवी दिल्लीdelhiदिल्ली