शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 12:24 IST

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या आवासून उभी राहिली आहे. या समस्येमध्ये वाहनांच्या धुराचा मोठा वाटा आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी नियम अधिक कठोर केले होते. आधीचे दंड 10 पटींनी वाढवत तुरुंगवासासारख्या शिक्षेचीही तरतूद केली होती. यामध्ये वाहनाची पीयुसी नसल्यास तब्बल 10000 रुपयांचा दंड आकारला जाणार होता. याच नियमाची अंमलबजावणी दिल्ली आरटीओने सुरु केली असून आता हळूहळू देशभरातही हे नियम लागू होण्य़ाची शक्यता आहे. 

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या आवासून उभी राहिली आहे. या समस्येमध्ये वाहनांच्या धुराचा मोठा वाटा आहे. हिवाळ्यात दिल्लीला याचा मोठा फटका बसतो. यामुळे दिल्ली सरकारने प्रदुषण करणारी वाहने हद्दपार करण्याचे ठरविले आहे. यानुसार दिल्ली सरकारने पीयुसी प्रमाणपत्र नसल्यास वाहन चालकांना तब्बल 10000 रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेद्वारे गेल्या काही दिवसांत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चलन फाडण्यात आले आहे. 

परिवहन विभागाने दिल्लीमध्ये 40 पथके तैनात केली आहेत. जी वाहनांचे पीयुसी प्रमाणपत्र तपासणार आहेत. दिल्लीमध्ये 13 मोठ्या प्रमाणावर प्रदुषण करणारे हॉटस्पॉट आहेत. याठिकाणी या टीम काम करणार आहेत. ही टीम वाहनांच्या इंधनाचे नमुनेही गोळा करत आहेत. त्यामध्ये कोणत्याप्रकारची भेसळ झाली आहे का, हे देखील तपासले जात आहे. 

१ सप्टेंबरला कायद्यात सुधारणाकेंद्र सरकारने 1 सप्टेंबर, 2019 मध्ये नवा मोटर वाहन सुधारणा कायदा लागू केला होता. यानुसार पीयुसी प्रमाणपत्र नसल्यास आधी 1000 रुपयांचा दंड 10000 रुपये करण्यात आला होता. या वाढीमुळे पीयुसी केंद्रांवर अचानक गर्दी होऊ लागली होती. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये निवडणुका असल्याने हे नव्या भरमसाठ दंडाचे नियम लागू करण्यात आले नव्हते. त्यानंतर गुसरातसह काही राज्यांनी ही दंडाची रक्कम कमी करत नवे नियम लागू केले होते. यानंतर कोरोना आल्याने लॉकडाऊन काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यामध्ये सूट दिली होती. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या....

लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले

स्वातंत्र्यदिनापूर्वी देशवासियांना मोदींनी दिली मोठी भेट; करदात्यांचा होणार सन्मान

रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा

राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने

तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही

Jio ची जबरदस्त ऑफर; अवघ्या 141 रुपयांत घेऊन जा JioPhone 2

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच कोसळला

Gold Rate : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसdelhiदिल्लीpollutionप्रदूषणcarकारNitin Gadkariनितीन गडकरी