आयकर विभागातील 'जुगाड' संपणार, कर प्रणाली झाली फेसलेस; मोदींकडून लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:36 AM2020-08-13T11:36:23+5:302020-08-13T11:42:08+5:30

#HonoringTheHonest पंतप्रधानांनी 'पारदर्शी कर व्यवस्था- ईमानदारांचा सन्मान' प्लॅटफार्मचे उद्घाटन केले.

PM Narendra Modi honours honest taxpayers, launches new taxation platform. | आयकर विभागातील 'जुगाड' संपणार, कर प्रणाली झाली फेसलेस; मोदींकडून लोकार्पण

आयकर विभागातील 'जुगाड' संपणार, कर प्रणाली झाली फेसलेस; मोदींकडून लोकार्पण

Next
ठळक मुद्देगेल्या सहा वर्षांत आमच लक्ष्य़ सरकारी प्रणालीमध्ये महत्वाचे बदल करण्यावर राहिला आहे. आजपासून नवा प्रवास सुरु झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, मोदींचे मिशन हे ईमानदार करदात्यांना पुरस्कार देणे आहे. लोकांच्या गरजेनुसार नियम बनविले जात आहेत. याचे चांगले परिणामही देशाला दिसू लागले आहेत.

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनापूर्वी मोदी यांनी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण करण्यात आले असून Transparent Taxation - Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. फेसलेस स्टेटमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टरची ही योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यापैकी फेसलेस स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर्सची सुविधा आजपासून सुरु होणार असून फेसलेस अपीलची सुविधा 25 सप्टेंबरपासून देशवासियांच्या सेवेत येणार असल्याचे मोदी म्हणाले. 




पंतप्रधानांनी 'पारदर्शी कर व्यवस्था- ईमानदारांचा सन्मान' प्लॅटफार्मचे उद्घाटन केले. गेल्या सहा वर्षांत आमच लक्ष्य़ सरकारी प्रणालीमध्ये महत्वाचे बदल करण्यावर राहिला आहे. आजपासून नवा प्रवास सुरु झाला आहे. देशाचा ईमानदार करदाता देशाच्या बांधणीसाठी मोठी भूमिका निभावत असतो. जेव्हा त्याचे आयुष्य सोपे होते, तेव्हा तो प्रगती करतो, यामुळे देशही प्रगती करू लागतो. आजपासून सुरु होणाऱ्या या सुविधेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी होणार असून अधिकाधिक कारभार चालविला जाणार आहे, असे मोदी म्हणाले. 




अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, मोदींचे मिशन हे ईमानदार करदात्यांना पुरस्कार देणे आहे. यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. आयकर विभाग आणि करदात्यांमध्ये ताळमेळ असेल. गेल्या वर्षी कार्पोरेट कर 30 वरून 20 टक्के केला होता. आयकर विभागाने अनेक सुधारणा लागू केल्या आहेत. करदात्यांना सन्मान देणे ही पंतप्रधानांची इच्छा आहे. 


लोकांच्या गरजेनुसार नियम बनविले जात आहेत. याचे चांगले परिणामही देशाला दिसू लागले आहेत. आता शॉर्टकट चुकीचा आहे, याचा भास साऱ्यांनाच होत आहे. चुकीचे मार्ग पकडणे योग्य नाहीय हे देखील ते जाणत आहेत. तो काळ आता मागे सरला आहे. आता कर्तव्य आणि देशसेवेची भावना जोर पकडत आहे. हा बदल सक्ती किंवा शिक्षा देऊन आलेला नाही. सरकारची जेव्हा निती स्पष्ट असते तेव्हा काळे करण्याची वृत्ती कमी होऊ लागते. सामान्यांचा विश्वास वाढू लागतो. सरकारी कामामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा वापर आणि सरकारी यंत्रणेतील चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार देणे ही यामागची कारणे आहेत, असे मोदी म्हणाले. 

फेसलेस म्हणजे काय? 
पंतप्रधानांनी ही योजना जाहीर करताना सांगितले की, नवीन सिस्टीमद्वारे ट्रान्सफर पोस्टिंगसाठी होणारे जुगाड, शिफारशी संपणार असून आयकर विभागाचा धाक जमविण्य़ाचे प्रयत्नही संपणार आहेत. हा प्रकार शून्यावर येणार आहे. आयकर विभागाला याचा फायदा होणार असून अनावश्यक खटले थांबणार आहेत. तसेच बदली, पोस्टिंगसाठी लावली जाणारी शक्तीही कमी होणार आहे. आयकर विभागाला आता करदात्यांच्या इज्जतीची संवेदनशीलतेने काळजी घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही प्रकारची शंका असेल तर करदात्यांना अपील आणि चौकशीचा अधिकार देण्यात आला आहे. आजच्या या पावलामुळे विना कटकट, विना त्रासदायक आणि फेसलेस कर प्रणालीकडे भारताने झेप घेतली असल्याचे मोदी म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

स्वातंत्र्यदिनानंतर लगेचच युद्धासारख्या मोठ्या संकटांचे संकेत; भारताच्या कुंडलीवरून भविष्यवाणी

लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले

सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात

रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा

राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने

तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही

Jio ची जबरदस्त ऑफर; अवघ्या 141 रुपयांत घेऊन जा JioPhone 2

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच कोसळला

Gold Rate : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

Read in English

Web Title: PM Narendra Modi honours honest taxpayers, launches new taxation platform.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app