राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई; भाजपनं हॅट्ट्रिक मारलेल्या MLAचं तिकीट कापलं, काँग्रेसनं टाकला नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:39 AM2022-11-24T10:39:11+5:302022-11-24T10:39:40+5:30

२२ वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. येथे विजयाची हॅट्रिक मारणारे आमदार गोविंदभाई पटेल यांचे तिकीट कापत रमेश टिलाला या बड्या उद्योगपतीला पुढे केले. यावेळी काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष हितेश वोरा यांना ‘हात’ दिला आहे.

Battle among Patidars In Rajkot; BJP drop the ticket of who became MLA three time, Congress made a new move | राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई; भाजपनं हॅट्ट्रिक मारलेल्या MLAचं तिकीट कापलं, काँग्रेसनं टाकला नवा डाव

राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई; भाजपनं हॅट्ट्रिक मारलेल्या MLAचं तिकीट कापलं, काँग्रेसनं टाकला नवा डाव

Next

राजकोट : भाजपचा गड असलेल्या राजकोटमधील दक्षिण व ग्रामीण हे दोन्ही मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपने दोन्ही ठिकाणी आपल्या आमदारांचे तिकीट कापत उमेदवार बदलले आहेत. लेउवा पाटीदार समाजाचे प्राबल्य असलेल्या दक्षिण राजकोटमध्ये भाजप, काँग्रेसआम आदमी पार्टी या तीनही पक्षांनी लेहुआ पाटीदार समाजाचेच उमेदार दिल्याने समाजातील मतदार संभ्रमात आहेत. त्यामुळे समाजाच्या कार्डपेक्षा पक्षाची ताकदच निकाल लावेल.

२२ वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. येथे विजयाची हॅट्रिक मारणारे आमदार गोविंदभाई पटेल यांचे तिकीट कापत रमेश टिलाला या बड्या उद्योगपतीला पुढे केले. यावेळी काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष हितेश वोरा यांना ‘हात’ दिला आहे.

चुनाव में हिरा ही चुनेंगे… -
दक्षिण राजकोट हे जगभरात नकली दागिने निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. हे आशियातील सर्वांत मोठे दागिने निर्मितीचे केंद्र मानले जाते. या इंडस्ट्रीची उलाढाल कोट्यवधींची आहे. मात्र, नकली दागिन्यांचा व्यापार करणारे येथील व्यापारी ‘चुनाव में हिरा ही चुनेंगे…’ असे ठासून म्हणत बरेच काही सांगून जातात.

भाजपची चलाख खेळी -
१९ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा गेल्या वेळी भाजपचे आमदार लाखाभाई सागठिया यांनी २१०० मतांनी जिंकली. यावेळी भाजपच्या सर्वेक्षणात ही जागा गमावण्याचा धोका दिसून आला. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करीत विद्यमान नगरसेविका भानुबेन बाबरिया यांना मैदानात उतरविले आहे.
 

Web Title: Battle among Patidars In Rajkot; BJP drop the ticket of who became MLA three time, Congress made a new move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.