बांबूला बांधून मृतदेह पोस्टमार्टमला, बिहार पोलिसांचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:12 IST2017-10-21T03:12:04+5:302017-10-21T03:12:34+5:30

बिहारच्या पोलिसांनी एक महिला आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाला बांबूला बांधून विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची घटना उघडकीस येताच खळबळ उडाली आहे.

 Barman bombs and post mortem of post mortem, Bihar Police Pratap | बांबूला बांधून मृतदेह पोस्टमार्टमला, बिहार पोलिसांचा प्रताप

बांबूला बांधून मृतदेह पोस्टमार्टमला, बिहार पोलिसांचा प्रताप

पाटणा : बिहारच्या पोलिसांनी एक महिला आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाला बांबूला बांधून विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची घटना उघडकीस येताच खळबळ उडाली आहे. कोणताही अपघात किंवा गुन्हा घडला असताना मृतदेह स्ट्रेचर किंवा अ‍ॅम्ब्युलन्समधूनच रुग्णालयात पोहोचविला जावा असा आदेश असताना पोलिसांनी हा नियम धाब्यावर बसविला.
एका महिलेने तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह वेगवान रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. त्याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्यांचे मृतदेह कपड्यात गुंडाळत बांबूला बांधून पोस्टमार्टमसाठी पाठविले. सासाराम रेल्वेस्थानकाजवळील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या अमानवी कृत्याबद्दल जोरदार टीका होत आहे.
आत्महत्या करणाºया महिलेचे नाव मालतीदेवी असून ती आनंदपुरा या गावाची रहिवासी आहे. ती पतीसोबत भाड्याच्या घरात राहात होती. दिवाळीच्या रात्री पतीसोबत भांडण झाल्यानंतर तिने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

 

Web Title:  Barman bombs and post mortem of post mortem, Bihar Police Pratap