उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मौलाना तौकिर रजा आणि त्याच्या संघटनेवर कारवाई केली आहे. दरम्यान, या हिंसाचारावेळी पोलिसांची हत्या करण्याचीही दंगेखोरांची योजना होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी नदीम याने पोलीस चौकशीमध्ये ही माहिती दिली आहे. या लोकांनी आमच्या नबीचा अवमान केला तर आपण फक्त पाहत राहणार का? याची एकच शिक्षा आहे ती म्हणजे शिरच्छेद, अशा घोषणा शुक्रवारी रस्त्यावर उघडपणे दिल्या जात होत्या.
पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी मौलाना तौकीर रजा याची संघटना असलेल्या आयएमसीचा नेता नदीम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जमावाला चिथावणी दिली. योजनाबद्ध रितीने हजारोंचा जमाव जमवण्यात आला. बाहेरूनही लोकांना बोलावण्यात आले. त्यांच्यामध्ये काही गुन्हेगारांचाही समावेश होता. तसेच त्यांच्याकडे बेकायदेशीर हत्यारेही होती.
दरम्यान, मौलाना तौकिर रजा याच्याविरोधात बरेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नदीम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चिथावणी दिल्यानंतर आज आम्ही आमचा हेतू साध्य करू. आज शहरातील वातावरण बिघडवायचं आहे, त्यासाठी पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, मुस्लिमांनी आपली ताकद दाखवली पाहिजे, असं मौलाना तौकीर रजा यांनी सांगितलं होतं, असे सांगत जमाव पुढे शरकर होता, असा उल्लेख तौकीर रजाविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला होता.
तौकिर रझाच्या या चिथावणीनंतर हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने धार्मिक घोषणा देत पोलिसांवर हल्ला केला होता. तसेच छतावरून दगडफेक केली. एवढंच नाही तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांशी हुज्जत झातली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर हे दंगेखोर घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, हा संपू्र्ण घटनाक्रम ड्रोन कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून, पोलीस त्याच्या आधारावर दंगेखोरांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत ८० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जणांचं एन्काऊंटर झालं आहे.
Web Summary : बरेली violence: Taukir Raza instigated mob, planning police killings. Arrested accused revealed Raza's hate speech fueled riots. FIR filed, arrests made.
Web Summary : बरेली हिंसा: तौकीर रजा ने भीड़ को उकसाया, पुलिस हत्या की योजना। गिरफ्तार आरोपी ने रजा के नफरत भरे भाषण से दंगे भड़के। एफआईआर दर्ज, गिरफ्तारियां।