शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

CoronaVaccine: "...हेच पंतप्रधा मोदींच्या उदारतेचं वास्तविक दर्शन", मोदींच्या 'फॅन' झाल्या 'या' देशाच्या पंतप्रधान

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 04, 2021 3:09 PM

जगभरातील देशांना कोरोना व्हायरस लशीचे लाखो डोस मोफत दिल्यानंतर, स्वतः कोरोना लस घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभरात कौतुक होत आहे. (Barbados pm Mia Amor Mottley praised pm Narendra Modi for Corina vaccine)

  ब्रिजटाऊन - व्हॅक्‍सीन मैत्री अभियानांतर्गत जगभरातील देशांना कोरोना व्हायरस लशीचे लाखो डोस मोफत दिल्यानंतर, स्वतः कोरोना लस घेतल्याने पंतप्रधाननरेंद्र मोदींचे (Narendra Modi) जगभरात कौतुक होत आहे. कॅरिब‍ियन देश बार्बाडोसच्या (Barbados) पंतप्रधान  मिआ अमोर मोटले (Mia Amor Mottley) तर या उदारतेमुळे पंतप्रधान मोदींच्या फॅनच झाल्या आहेत. त्यांनी स्वतःच ट्विट करून पंतप्रधान मोदींच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. (Barbados pm Mia Amor Mottley praised pm Narendra Modi for Corina vaccine via vaccine maitri campaign)

पंतप्रधान मोटले यांनी लिहिले आहे, 'पंतप्रधान मोदींनी स्वतः कोरोना लस घेण्याआधी बार्बाडोसमधील 40 हजार लोक आणि जगातील लाखो लोकांना व्हॅक्‍सीन मैत्रीच्या माध्यमाने कोविड-19 व्हॅक्‍सीन मिळवणे शक्य केले. हेच त्यांच्या उदारतेचे वास्तवीक दर्शन आहे. खूप-खूप धन्यवाद आणि मी आपल्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करते.' यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सोमवारी राजधानी दिल्लीत AIIMS मध्ये कोविड-19 लशीचा पहिला डोस घेतला.

IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार

भारताला कोरोना मुक्त करण्यात सहकार्य करण्याचे आवाहन -लस घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी भारताला कोरोना मुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही केले होत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले होते, की ""एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कौतुकास्पद आहे." तसेच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत आपण सर्व मिळून भारत कोरोनामुक्त बनवूयात, असेही नरेंद्र मोदीं यांनी म्हटले होते."

खूशखबर! भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन 81 टक्के परिणामकारक; सीरमच्या लसीला टाकले मागे

पंतप्रधान मोदींनी भारत बॉयोटेकच्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बॉयोटेक कंपनीची कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतला आहे. दिल्लीतील एम्समध्ये कार्यरत असणाऱ्या पडुचेरी येथील सिस्टर पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोना लसीचा डोस दिला. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या टप्प्यामध्ये केले जात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधान