Infosys Accenture to cover cost of Corona virus vaccine for employees and immediate family itc limited mahindra also started thinking | IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार

IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार

ठळक मुद्देदेशात आता करोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे.सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जातेय लस

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या इन्फोसिस लिमिटेड (Infosys Limited) आणि कन्सल्टिंग आणि आउटसोर्सिंग सर्विसेज प्रोवायडर Accenture Plc नं आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या कंपन्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

सध्या भारतात करोना प्रतिंबधात्मक लसीच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या, तसंच ज्यांना गंभीर आजार आहेत अशा लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये हे लसीकरण मोफत केलं जाणार आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी २५० रूपये आकारले जातील. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार इन्फोसिस आरोग्य सेवा देणाऱ्यासोबतच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या लसीकरणावर विचार करत आहेत. इन्फोसिसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविण राव यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

अन्य कंपन्यांचाही सहभाग

याव्यतिरिक्त अॅक्सेंन्चर या कंपनीनंदेखील कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना जे लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांना लसीकरण करणार आहे. आतापर्यंत भारत सरकारनं भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसींच्या वापरास मान्यता दिली आहे. अनेक भारतीय कंपन्या मग यात ऑटो टू टेक्नॉलॉजी समूह महिंद्रा ग्रुपस कंझ्युमर गुड्य कंपनी आयटीसी लिमिटेड यांचाही समावेश आहे. या कंपन्यांनी जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम कशी राबवता येईल यावर विचार सुरू केला होता. सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं लसीकरण सुरू असून या अंतर्गत सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Infosys Accenture to cover cost of Corona virus vaccine for employees and immediate family itc limited mahindra also started thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.