शरीर संबंधास नकार दिल्याने बार डान्सरला विवस्त्र करत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 13:57 IST2019-06-17T13:56:06+5:302019-06-17T13:57:36+5:30

तिने काही महिन्यांपूर्वीच या बारमध्ये नोकरी पत्करली होती. तेव्हापासूनच तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत होते.

bar dancer stripped and beaten by colleagues for refusing sexual favors to customers | शरीर संबंधास नकार दिल्याने बार डान्सरला विवस्त्र करत मारहाण

शरीर संबंधास नकार दिल्याने बार डान्सरला विवस्त्र करत मारहाण

हैदराबाद : हैदराबादमध्ये एका महिला डान्सरला एक व्यक्ती आणि चार अन्य महिला डान्सरांनी मिळून विवस्त्र करत मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, ग्राहकासोबत शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने हा घाणेरडा प्रकार करण्यात आला. 


पंजागुट्टा पोलिसांनी चारही संशयित महिला आरोपींना अटक केली आहे. तर पुरुष फरार झाला आहे. पोलिस या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडित महिलेने पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार केली होती. यानंतर लगेचच आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनुसार महिलेने सांगितले की, तिने काही महिन्यांपूर्वीच या बारमध्ये नोकरी पत्करली होती. तेव्हापासूनच तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत होते. तिच्या पाच सहकाऱ्यांनी तिला ग्राहकांना सेक्सुअल फेवर देण्यास सांगितले होते. मात्र, जेव्हा तिने असे करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पीडितेला विवस्त्र करत मारहाण केली. 


पोलिसांनी सांगतिले की, बारच्या व्यवस्थापकांनी या महिलेला ग्राहकांकडे जाऊन अश्लिल हावभाव करण्यास सांगितले होते. आरोपींविरोधात गुन्हा दाखला झाला आहे. या प्रकाराबाबत तेलंगानाचे डीजीपी महेंद्र रेड्डी यांनी अहवाल मागविला आहे. 

Web Title: bar dancer stripped and beaten by colleagues for refusing sexual favors to customers