शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"बापू एक व्यक्ती नव्हे तर विचार, अहंकारी सत्तेने..."; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनी काय म्हणाले राहुल गांधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:15 IST

... कारण गांधी भारताच्या आत्म्यात अमर आहेत," असे म्हणत राहूल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. यावेळी, "बापू ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक असा विचार आहे, जो कधीही नष्ट केला जाऊ शकत नाही. कारण गांधी भारताच्या आत्म्यात अमर आहेत," असे म्हणत राहूल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राहुल गांधी 'एक्स'वर पोस्ट करत म्हणाले, "महात्मा गांधी एक व्यक्ती नाही, एक विचार आहे. असा विचार, जो कधी ब्रिटीश साम्राज्याने, कधी द्वेषाच्या विचाराने तर कधी अहंकारी सत्तेने नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. राष्ट्रपित्याने आपल्याला स्वातंत्र्यासोबतच एक मूलमंत्र दिला, सत्तेच्या ताकदीपेक्षा सत्याची शक्ती मोठी असते आणि हिंसा व भयापेक्षाही अहिंसा आणि साहस मोठा असतो. ही विचार नष्ट होऊ शकत नाही. कारण गांधी भारताच्या आत्म्यात अमर आहेत. 

यावेळी, काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी १९४८ मधील सरदार वल्लभभाई पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यातील पत्रव्यवहाराचा संदर्भ दिला. गांधीजींच्या हत्येपूर्वी पंडित नेहरूंनी आणि त्यानंतर १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेलांनी मुखर्जींना एक पत्र लिहिले होते,  स्वतःला राष्ट्रवादाचे रक्षक म्हणवणाऱ्यांसंदर्भात या पत्रात गंभीर आरोप आहेत, असे रमेश यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपचे खासदार अभिजीत गंगोपाध्याय यांच्या 'गांधी आणि गोडसे यांच्यात निवड करू शकत नाही' या विधानाचा समाचार घेत, ही मानसिकता बरेच काही स्पष्ट करते, असेही रमेश यांनी म्हटले आहे. आपल्या पोस्टसोबत रमेश यांनी नेहरूंनी गांधीजींच्या हत्येनंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची लिंकही त्यांनी यावेळी शेअर केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस