10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:18 IST2025-05-19T15:16:37+5:302025-05-19T15:18:10+5:30
Bank Of Baroda Recruitment 2025: देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने दहावी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली.

10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
बँकेतनोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ असून त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. यात एकूण ५०३ जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला २९ जागा आल्यात. सदर उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. दरम्यान, या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल, निवड झालेल्या उमेदवारांना किती पगार दिला जाईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये आहे. तर एससी/एसटी प्रवर्ग, अपंग आणि महिलांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. ऑनलाइन चाचणी आणि कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल.
बँक ऑफ बडोदा भरती: वय
या नोकरीसाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २६ वर्षे असावे. ०१/०५/१९९९ आधी जन्म झालेले उमेदवार या नोकरीसाठी पात्र नाहीत.
बँक ऑफ बडोदा: पगार
बँक ऑफ बडोदामधील ऑफिस असिस्टंट म्हणजेच शिपाई यांचे वेतनमान दरमहा १९ हजार ५००-३७ हजार ८१५ रुपये इतके असेल.
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.