हॉटेलवर बोलावले अन् चाकूचे १७ वार केले, विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:42 IST2025-06-09T17:42:16+5:302025-06-09T17:42:54+5:30
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

हॉटेलवर बोलावले अन् चाकूचे १७ वार केले, विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या
Karnatak Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या प्रियकराने तिच्या शरीराच्या चाकूचे १७ वार केले. मृत महिलेचे नाव हरिनी (३६) असून, आरोपी प्रियकराचे नाव यश (२५) आहे.
आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर मृत हरिनी विवाहित होती. हरिनीचे यशसोबत अवैध संबंध होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून,या आणि प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हरिनी आणि यशचे अवैध संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, हरिनी आणि यश एका जत्रेत भेटले होते. यादरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. यादरम्यान महिलेचा पती दासे गौडाला तिच्यावर संशय येऊ लागला. त्याने हरिनीचा फोन तपासला असता, त्याला दोघांच्या संबंधांची माहिती मिळाली. त्यानंतर दासे गौडाने हरिनीला घरात कोंडून ठेवले.
दरम्यान, प्रियकर यश हरिणीशी संपर्क साधू न शकल्याने वेडा झाला होता. म्हणूनच त्याने तिला शोधून मारण्याचा निर्णय घेतला. ६ जून रोजी अनेक दिवसांनंतर दोघांचे बोलणे झाले, त्याने तिला ओयो हॉटेलमध्ये बोलावले. तिथे दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले, पम त्यानंतर यशने हरिनीची चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांसमोर आरोपीने कबूल केले की, हरिनी त्याच्यापासून दूर राहिल्यामुळे त्याने तिची हत्या केली.