बाबो! नवरा लेकीच्या सासरी गेल्यावर बायकोने संधी साधली, शेजाऱ्यासोबत पळून गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:57 IST2023-12-01T17:56:08+5:302023-12-01T17:57:12+5:30

एक व्यक्ती आपल्या मुलीच्या सासरी गेला होता. याच दरम्यान संधीचा फायदा घेत त्याची 50 वर्षीय पत्नी शेजाऱ्यासोबत पळून गेली.

banda 50 year old woman ran away with neighbor | बाबो! नवरा लेकीच्या सासरी गेल्यावर बायकोने संधी साधली, शेजाऱ्यासोबत पळून गेली अन्...

बाबो! नवरा लेकीच्या सासरी गेल्यावर बायकोने संधी साधली, शेजाऱ्यासोबत पळून गेली अन्...

उत्तर प्रदेशच्या बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्या मुलीच्या सासरी गेला होता. याच दरम्यान संधीचा फायदा घेत त्याची 50 वर्षीय पत्नी शेजाऱ्यासोबत पळून गेली. महिलेला जाताना पाहून शेजाऱ्यांनी तिच्या पतीला फोन केला संपूर्ण हकीकत सांगितली. तो पटकन घरी परतला आणि त्याने आपल्या पत्नीचा खूप शोध घेतला. मात्र, तिचा शोध लागला नाही. यानंतर त्याने पोलिसांकडे जाऊन आपली व्यथा मांडली.

मटौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, तो आपल्या मुलीच्या सासरच्या घरी गेला होता. घरी बायको होती, ती संधी साधून कुठेतरी निघून गेली. त्याने गावातील दोन लोकांवर पत्नीला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. तो कानपूरहून फतेहपूरला पत्नीच्या शोधासाठी गेला होता. मात्र ती सापडली नाही.

पोलिस ठाण्यात सुनावणी होत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने आता एसपी साहेबांना मदत करण्याची विनंती केली. "साहेब, माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे. गावातील लोकांनी तिला पळवून नेलं आहे. माझं ऐकणारं कोणी नाही. माझ्या पत्नीचा शोध घ्या" असं म्हटलं आहे. 

याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी मटौंध रामदिनेश तिवारी यांनी सांगितलं की, याप्रकरणी बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. महिलेचे वय जवळपास 50 वर्षे आहे. तिला मोठी मुलं आहेत. व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे पाळत ठेवून महिलेचा शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: banda 50 year old woman ran away with neighbor