आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर DGCA ने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 17:10 IST2021-07-30T17:07:52+5:302021-07-30T17:10:54+5:30
international flights: भारतात 23 मार्च 2020 ला आंतरराष्ट्रीय उड्डाणांव बंदी घालण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर DGCA ने घेतला निर्णय
नवी दिल्ली: नागरी उड्डयण संचालनालयाने (DGCA) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लावली बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. शुक्रवारी जारी एका सर्कुलरद्वारे ही माहिती देण्यात आली. पण, ही बंदी सर्व आंतरराष्ट्रीय कार्गो आणि विशेषतः डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाइट्सवर लागू होणार नाहीत. डीजीसीएने सांगितल्यानुसार, ही बंदी 31 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 59 मिनीटांपर्यंत लागू असतील.
— DGCA (@DGCAIndia) July 30, 2021
यापूर्वी, देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली होती. पण, आता जारी नवीन आदेशानुसार कार्गो विमानांना आणि DGCA ने मंजूरी दिलेल्या विशेष विमानांना या यादीतून वगळण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे भारतात 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांव बंदी घालण्यात आली होती. पण, मे 2020 पासून वंदे भारत अभियान आणि जुलै 2020 पासून ठराविक देशांमध्ये द्वीपक्षीय ‘एअर बबल’ अंतर्गत विशेष विमानांना उडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
भारताचा अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार
भारताचा अमेरिका, ब्रिटेन, संयुक्त अरब अमीरात, केन्या, भूटान आणि फ्रांससह अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार आहे. या करारा अंतर्गत दोन देशांमधील प्रवासा परवानगी असेल.