शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीविक्रेत्यांना गंगाघाटावर व्यवसायास मनाई पोलिसांचा बंदोबस्त : सानप शिष्टाई अयशस्वी, आयुक्तांनी दिला नकार

By admin | Updated: December 25, 2015 23:57 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात स्थलांतरित झालेला गोदाकाठचा म्हणजेच गंगेवरील भाजीबाजार पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना अपयश आले. आमदार बाळासाहेब सानप यांनी शिष्टाई करून या विक्रेत्यांना व्यवसाय करू देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र गंगाघाटावर पाालिकेने कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने व्रिकेत्यांना माघारी परतावे लागले. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात स्थलांतरित झालेला गोदाकाठचा म्हणजेच गंगेवरील भाजीबाजार पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना अपयश आले. आमदार बाळासाहेब सानप यांनी शिष्टाई करून या विक्रेत्यांना व्यवसाय करू देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र गंगाघाटावर पाालिकेने कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने व्रिकेत्यांना माघारी परतावे लागले. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत.गंगाघाटावरील भाजीबाजार अत्यंत जुना असून, अनेक विक्रेत्यांची चौथी पिढी व्यवसाय करीत आहेत. मात्र, त्यांनी आता गणेशवाडी येथील भाजीमंडईत स्थलांतरित करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. कुंभमेळ्याचे निमित्त करून हे विक्रेते चालू वर्षी स्थलांतरित झाले. मात्र, त्यानंतर महापालिकेने अद्याप त्यांना या जागी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून विक्रेत्यांना अन्यत्र व्यवसाय करावा लागत आहे त्या पार्श्वभूमीवर पुन्हा व्यवसायासाठी अगतिक असलेल्या विक्रेत्यांना भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांनी शिष्टाई करण्याचे आश्वासन गुरुवारी दिले आणि शुक्रवारी सकाळपासून येथेच व्यवसाय सुरू करा, असे सांगितले होते. मात्र, पालिकेला हा प्रकार कळाल्यानंतर भल्या सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक तैनात होते. त्यामुळे विक्रेत्यांनी स्थानिक अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे दुपारी सु˜ीच्या दिवशी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तडॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेण्यात आली. मात्र, त्यांना गंगाघाटावर व्यवसाय करता येणार नाही, असे आयुक्तडॉ. गेडाम यांनी निक्षून सांगितले. गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी प्रदूषण होऊ देणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे काही झाले तरी येथे व्यवसाय करता येणार नाही, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. त्यामुळे विक्रेत्यांचा हिरमोड झाला. आयुक्तांना भेटणार्‍यांमध्ये राजू भोरे, भीमराव सोनवणे, शांतराम क्षीरसागर, अनंत येवले, दिलीप नेरकर यांचा समावेश होता.फोटो आहेत...इन्फो..आयुक्तांनी सुचवले उपायभाजीविक्रेत्यांसाठी गणेशवाडी येथील नवी मंडई हा पर्याय असल्याचे आयुक्तांनी सांगितले, तर गणेशवाडीजवळील एक पाच एकराचा भूखंड विक्रेत्यांनी देण्याची मागणी केली, त्यावर आयुक्तांनी विभागीय अधिकार्‍यांना पाहणी करून त्या जागेसंबंधी अहवाल देण्याचे सूचित केले.