शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदी? केंद्र सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 07:42 IST

Social Media News: केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. फक्त ‘कू’ या समाजमाध्यमी ॲपनेच नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यात केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. त्यांचा स्वीकार करण्यासाठी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांना इलेक्ट्रॉनिक्स  आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे २५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत मंगळवारी समाप्त झाली. मात्र, अद्याप वरील तीनही समाजमाध्यमांनी नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा अंगीकार केलेला नाही. त्यामुळे भारतीय कायद्याचे  पालन करण्यात असमर्थ ठरल्याप्रकरणी या सर्व समाजमाध्यमांवर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकार वापरू शकते.  दरम्यान, फेसबुक आणि  ट्विटर यांनी आम्ही केंद्राकडे सहा महिन्यांची मुदत मागितली असल्याचे स्पष्ट केले आहे.  

केंद्र सरकारद्वारा आणल्या गेलेल्या नव्या नियमांचे  पालन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. परंतु काही मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करणे आवश्यक आहे. नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठीची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून थोडा अवधी लागेल.     - फेसबुक प्रवक्ता   

काय आहेत नवे नियम? -नव्या नियमानुसार सर्व समाजमाध्यम कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकाऱ्याची नेमणूक करणे बंधनकारक आहे -संबंधित अधिकारी समाजमाध्यमांवर येणारा मजकूर आक्षेपार्ह आहे का, त्यासंदर्भात काही तक्रारी आहेत का, याची शहानिशा करेल. मजकूर आक्षेपार्ह असल्याचे आढळल्यास तो तत्काळ हटविण्याचे अधिकार त्यास असतील- हे नियम केवळ समाजमाध्यमी कंपन्यांनाच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्म्सनाही लागू आहेत-समाजमाध्यमी कंपन्यांचे स्वनियम कायदे नसल्याने विविध मंत्रालयांतील प्रतिनिधींची एक समिती स्थापन करून त्यांच्यावर अंकुश ठेवला जाईल, असेही नवीन नियम सुचवतात

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटरInstagramइन्स्टाग्रामCentral Governmentकेंद्र सरकार