Video - हाण की बडीव! २ महिला अधिकारी ऑफिसमध्ये भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:12 IST2026-02-17T18:10:58+5:302026-02-17T18:12:00+5:30

एक संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी कामादरम्यान दोन महिला कर्मचारी आपापसात भिडल्या.

ballia women blo fight meeting video viral abuse allegation | Video - हाण की बडीव! २ महिला अधिकारी ऑफिसमध्ये भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील बलिया येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी कामादरम्यान दोन महिला कर्मचारी आपापसात भिडल्या. ही घटना भृगु आश्रम येथील कंपोझिट स्कूलमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. 'SIR' संदर्भात एक महत्त्वाची बैठक सुरू होती, मात्र पाहता पाहता या बैठकीचं रूपांतर हाणामारीत झालं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला बीएलओ (BLO) एकमेकींचे केस धरून ओढताना स्पष्ट दिसत आहेत. बराच वेळ तिथे एकमेकींना खाली पाडणं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू होती. या प्रकरणात महिला बीएलओ सुमन देवी यांनी दुसऱ्या बीएलओ नीलम सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सुमन देवी यांच्या सांगण्यानुसार, त्यांना नोटीस वाटपासाठी बोलावण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना जास्त नोटीस देण्यात आल्या, तेव्हा नीलम सिंह संतापल्या. त्यांचा असा आरोप आहे की, नीलम सिंह यांनी त्यांना अपमानित केलं आणि जातीवाचक शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर नीलम सिंह यांनी सुमन देवी यांना केसाला धरून जमिनीवर आपटलं आणि फरफटत नेलं.

महिलांना चपलेने देखील एकमेकींना मारहाण केली. सुमन देवी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे, मात्र अद्याप त्यांची दखल घेतली जात नसल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी कामावर असताना कर्मचाऱ्यांमध्ये झालेला हा हिंसाचार आणि जातीय अपमानाचा प्रकार पाहता, आता प्रशासन कठोर पावलं उचलणार की हे प्रकरण दाबलं जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title : उत्तर प्रदेश: कार्यालय में महिला अधिकारियों की लड़ाई, एक-दूसरे के बाल खींचे।

Web Summary : उत्तर प्रदेश के बलिया में, दो महिला सरकारी कर्मचारी स्कूल में काम के दौरान आपस में भिड़ गईं। एक बैठक हिंसक हो गई, जिसमें मारपीट और जातिवादी गालियों के आरोप लगे। एक महिला ने पुलिस में शिकायत दर्ज कराई है कि उस पर हमला किया गया और दुर्व्यवहार किया गया।

Web Title : Uttar Pradesh: Female officers brawl in office, pull each other's hair.

Web Summary : In Uttar Pradesh's Ballia, two female government employees physically fought during work at a school. A meeting turned violent, with accusations of assault and casteist slurs. One woman filed a police complaint alleging she was attacked and abused.