बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:35 IST2025-09-25T11:35:00+5:302025-09-25T11:35:31+5:30
Raja Bhaiya News: उत्तर प्रदेशमधील राजकारणात बाहुबली नेते म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्यात तीव्र मतभेद झाले असून, आता या वादामध्येत्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे.

बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’
उत्तर प्रदेशमधील राजकारणात बाहुबली नेते म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्यात तीव्र मतभेद झाले असून, आता या वादामध्येत्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे. तसेच राजा भैय्या यांचा धाकटा मुलगा ब्रिजराज प्रताप सिंह याने वडिलांची बाजू घेत आई भानवी सिंह हिच्यावर टीका केली आहे. तर थोरला मुलगा शिवराज प्रताप याने राजा भैय्या यांच्या घरात वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असल्याच्या भानवी सिंह यांनी केलेल्या आरोपाला सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आमच्या घरात अणुभट्ट्या आहेत का? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.
भानवी सिंह यांनी केलेल्या आरोपांना राजा भैय्या यांचा धाकटा मुलगा ब्रिजराज प्रताप सिंह यानेही सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून आई-वडील आणि मुलांमध्ये सुरू असलेला वाद आणि घरात घातक हत्यार असल्याच्या आरोपांपर्यंत सर्वावर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवराज प्रताप सिंह आणि ब्रिजराज प्रताप सिंह यांनी त्यांच्या पोस्टमधून आई भानवी सिंह ही वडिलांना बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच हा एक राजकीय कट असल्याचाही दावा केला आहे.
शिवराज प्रताप सिंह याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आईने कोर्टामध्ये १०० कोटी रुपये एकरकमी देण्याची आणि २५ लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली आहे. आईकडे वडिलांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आहे. तरीही ती पीडित असल्याचा आणि महिला असल्याचा भावूक दावा करत आहे, असा आरोप मुलांनी केला आहे.
आमची आई स्वत: घर सोडून गेली होती. तसेच १० वर्षांहून अधिक काळापासून ती वेगली राहत आहे. आई-वडिलांनी समजूत घातल्यानंतरही ती माघारी परतली नाही, असा आरोप शिवराज प्रताप सिंह याने केला. तर आमची आजी रुग्णालयात होती. तसेच तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी आई आपल्या कुटुंबाची इज्जत रस्त्यावर आणत होती. आता आम्ही दोन्ही भाऊ आईचं पुढचं लक्ष्य असू, असा दावा ब्रिजराज प्रताप सिंह याने केला आहे.