Baap Baap hota hain... MLA Rajasingh Critics on Akhilesh yadav | 'बाप बाप होता है'... आमदार राजासिंह यांची अखिलेश यादवांवर खरमरीत टीका
'बाप बाप होता है'... आमदार राजासिंह यांची अखिलेश यादवांवर खरमरीत टीका

मुंबई - तेलंगणातील भाजपाचे एकमेव आमदार असलेल्या राजासिंग यांनी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. तर, मुलायम सिंह यांनी मुलाला त्याची जागा दाखवून दिली. बाप बाप होता है... असे म्हणत आमदार राजासिंग यांनी अखिलेश यांच्यावर टीका केली. अखिलेश यांना मायावती अन् ममता बॅनर्जींची पुळका आलाय. पण, वडिलांनी शेवटी दाखवून दिल की मी तुझा बाप आहे, असे राजासिंह यांनी म्हटलंय. 

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याचाच प्रत्यय आला. राजकारणात कोण कधी कोणाची बाजू घेईल आणि कोण कोणाच्या विरोधात जाईल, याची प्रचिती आज लोकसभेत आणि लोकसभेबाहेरदेखील आली. समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यांनी चक्क नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मोदींना शुभेच्छाही दिल्या. मुलायम यांची ही इच्छा ऐकून मोदींच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्यानतर, भाजपा खासदारांनी बाकं वाजवून मोदींना शुभेच्छा दिल्या व मुलायम सिंह यांच्या वक्तव्याचे स्वागत केलं. तर भाजपा खासदार राजासिंह यांनीही मुलायम सिंहांच्या वक्तव्याचं स्वागत करताना अखिलेश यांच्यावर प्रहार केला. 


मुलगा कधी बहनजी म्हणजे मायावतींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करतो, तर कधी दीदी म्हणजेच ममता बॅनर्जी यांना घोषित करतो. आणि वडिलांना पडद्याआड करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बाप तो बाप होता है... असे म्हणत राजासिंह यांनी अखिलेश यादव यांना टार्गेट केलं. मुलायम सिंह यांनी थेट संसदेत एकाचवेळी सर्वांना पडद्याआड केलं. एकाचवेळी सर्वांचा बँड वाजवला. कारण, मुलायम सिंह यांनी संसदेत सर्वांसमक्ष मोदींनी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा असं म्हटलं आहे.
 

Web Title: Baap Baap hota hain... MLA Rajasingh Critics on Akhilesh yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.