शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict: अंतिम सुनावणीवेळी नाट्यमय घडामोडी; मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी नकाशा फाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:53 IST

सुनावणीचा आजचा 40 वा दिवस आहे.

नवी दिल्ली : गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात पूर्ण होणार आहे. 

या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्षकारांनी आपली बाजू लिखित स्वरुपात सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. यावेळी हिंदू माया सभेच्या पक्षकाराकडून सुनावणीसाठी आणखी काही वेळ मागितला होता. मात्र,  या प्रकरणी सुनावणी आजच पूर्ण होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. रंजन गोगोई म्हणाले, 'पुरे झाले आता, सुनावणी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल.'

नाट्यमय घडामोडी, धवन यांनी नकाशा फाडला...आजच्या सुनावणीवेळी नाट्यमय घडामोडी पाहयला मिळाल्या. राम मंदिरवर हिंदू महासभेच्या वकिलांनी ऑक्सफोर्ड पुस्तकातील नकाशाचा हवाला दिला. यावेळी मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी या पुस्तकाचा नकाशा फाडला. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'जर असेल होत असेल तर आम्ही उठून जाऊ.'

काल झालेल्या सुनावणी दरम्यान अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर मशीद बांधण्याची बाबराने केलेली ‘ऐतिहासिक चूक’ होती. हिंदूंची पुरातन काळापासूनची श्रद्धा लक्षात घेऊन, त्या वादग्रस्त जागेवरील हिंदूंचा हक्क मान्य करून ती चूक सुधारण्याची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन हिंदू पक्षकारातर्फे सर्वोच्च न्यायालयात केले गेले. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या विशेष पीठापुढे 39व्या दिवशी महंत मोहन दास या पक्षकाराच्या वतीने अ‍ॅड. के. पराशरन यांनी युक्तिवाद केला. या जागेच्या मालकीसंबंधी उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने केलेल्या दिवाणी दाव्यात महंत मोहनदास प्रतिवादी आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आजचा सुनावणीचा 40 वा दिवस आहे.  त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेतेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना 17 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय