Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 01:44 PM2019-11-09T13:44:53+5:302019-11-09T13:51:34+5:30

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल. तसेच या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करत आहे असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

Ayodhya Verdict Congress welcomes Ayodhya verdict, appeals for peace | Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल'

Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल'

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं काँग्रेसने स्वागत केलं आहे.'निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत'

नवी दिल्ली - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. कित्येक दशकांपासून न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणी न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं काँग्रेसने स्वागत केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल. तसेच या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करत आहे असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत असं देखील सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

'सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचा काँग्रेस सन्मान करते. हा निकाल एक प्रकारे श्रद्धा व विश्वासाचाही सन्मान आहे. सर्व समाजघटकांनी न्यायालयाचा निकाल मान्य करून शांतता राखावी. देशातील परस्पर सौहार्द व एकतेची परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. रामजन्मभूमीच्या निर्णयाचं श्रेय कोणतीही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेने घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत' असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा निर्णय न्यायालयानं सुनावला. तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखा. एक न्यास स्थापन करुन मंदिर निर्माणाचा आराखडा द्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. शिया वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यात यावी, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच इतरत्र पाच एकर जमीन दिली जावी आणि ती मोक्याची असावी, असं न्यायालयानं निकालाचं वाचन करताना म्हटलं. 

सुन्नी वक्फ बोर्डानं न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत केलं आहे. हिंदू पक्षकारांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत यामधून विविधतेतील एकता जपली गेल्याचं म्हटलं आहे. तत्पूर्वी न्यायालयात निकाल वाचन सुरू होताच शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळण्यात आला. शिया आणि सुन्नी या दोन समुदायांमध्ये वाद होता. वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्डची नसून आमची आहे असा शिया बोर्डचा दावा होता. तो आधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळे शिया बोर्डनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानंदेखील त्यांचा दावा फेटाळला. याशिवाय निर्मोही आखाड्याचा दावादेखील न्यायालयानं फेटाळून लावला आहे. 


 

Web Title: Ayodhya Verdict Congress welcomes Ayodhya verdict, appeals for peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.