Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Live: तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 08:26 AM2020-08-05T08:26:47+5:302020-08-05T11:38:52+5:30

अयोध्या  - केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या  राम मंदिराच्या ...

Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: Ram Mandir Bhumi poojan by PM Narendra modi at 12.44 PM | Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Live: तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी

Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Live: तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी

Next

अयोध्या - केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. 

02:01 PM

हे मंदिर केवळ ऐतिहासिक नाही, तर पुनरावृत्ती करणार आहे : मोदी



 

01:56 PM

राम मंदिर आपल्या आधुनिक संस्कृतीचे, भक्तीचे प्रतिक बनेल : मोदी



 

01:45 PM

तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी


01:38 PM

ऐतिहासिक सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टचे आभार : मोदी

ऐतिहासिक सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टचे आभार, हे माझे सौभाग्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी 



 

01:24 PM

मोहन भागवतांना आली लालकृष्ण अडवाणींची आठवण

अनेक जण आज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. अनेकांना या परिस्थितीमुळे बोलवता आले नाही. लालकृष्ण अडवाणी घरी बसून हा सोहळा पाहत असतील : सरसंघचालक मोहन भागवत



 

01:00 PM

राम मंदिराचे भूमीपूजन संपन्न; स्टेजवरील सोहळा सुरु होणार



 

12:46 PM

अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन सोहळा लाईव्ह इथे पहा

12:43 PM

जगभरातून तब्बल 2.75 लाख चांदीच्या विटा पाठविल्या

जगभरातून तब्बल 2.75 लाख चांदीच्या विटा पाठविल्या, त्यापैकी जय श्री राम लिहिलेल्या केवळ 100 विटा निवडल्या. त्यातील 9 विटा भूमीपूजनस्थळी.



 

12:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून भूमीपूजन



 

12:20 PM

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन कार्यक्रम सुरू



 

12:17 PM

राम मंदिराच्या भूमीपूजनाला सुरुवात



 

12:16 PM

नरेंद्र मोदींकडून पारिजातकाचे वृक्षारोपण



 

12:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले रामलल्लाचे दर्शन



 

11:54 AM

परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले हनुमान गढीचे दर्शन



 

11:38 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले



 

11:19 AM

सोलापूरात घरांवर श्री रामाचे ध्वज आणि गुढ्या उभारून घरांना तोरण

11:13 AM

सरसंघचालक मोहन भागवत भूमीपूजन स्थळी



 

10:35 AM

अयोध्येने सर्वांना एकत्र आणले - उमा भारती



 

10:35 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊला पोहोचले. अयोध्येला हेलिकॉप्टरने जाणार.



 

10:26 AM

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामजन्मभूमी परिसरात दाखल

10:02 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाबाहेर राम मंदिर, जय श्रीरामची रांगोळी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाबाहेर राम मंदिर, जय श्रीरामची रांगोळी.

09:44 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना

 

09:42 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी अयोध्येला रवाना झाले. 



 

09:42 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना

 

09:25 AM

अयोध्येतील राम जन्मभूमी येथे असलेली भगवान श्रीरामाची मूर्ती

09:25 AM

आजचा दिवस ऐतिहासिक - बाबा रामदेव

09:23 AM

बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य

09:00 AM

वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटल हिलवर अमेरिकेतील रामभक्त जमले.


Web Title: Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: Ram Mandir Bhumi poojan by PM Narendra modi at 12.44 PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.