शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:12 IST

Ayodhya Deepotsav 2025: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Ayodhya Deepotsav: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. नवव्या दीपोत्सवाच्या निमित्ताने 'राम की पैड़ी' आणि सरयू नदीच्या ५६ घाटांवर तब्बल २६ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. यासह अयोध्येने पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे.

मागील वर्षीचा विक्रम २६ लाख ११ हजार १०१ दिव्यांचा होता, तर यावर्षी तो मोडीत काढत २६,१७,२१५ लाख दिव्यांनी रामनगरी उजळून निघाली. या विक्रमाची नोंद करण्यासाठी गिनीज बुकची टीम स्वतः अयोध्येत उपस्थित होती.

अयोध्येतील प्रत्येक चौक, रस्ता आणि मंदिर पुष्प, प्रकाश आणि रांगोळ्यांनी सजलेले होते. वातावरणात “जय श्रीराम” चा जयघोष घुमत होता.
त्रेतायुगात प्रभू रामांनी १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत येऊन जे स्वागत अनुभवले होते, त्याच पवित्रतेचा आणि आनंदाचा अनुभव आज पुन्हा घेतल्यासारखा भासत होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पक विमानाच्या प्रतीकात्मक स्वरूपात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींचे स्वागत केले. यानंतर रामकथा पार्कच्या मंचावर श्रीरामाचा राज्याभिषेक (राजतिलक) करण्यात आला. भरत मिलापाचे दृष्य साकारले गेले आणि संपूर्ण परिसर “जय श्रीराम” च्या घोषाने दुमदुमला.

योगी आदित्यनाथांनी श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि गुरु वशिष्ठ यांना तिलक लावून आरती केली, त्यानंतर रामललाच्या दर्शनासाठी श्रीराम जन्मभूमी मंदिरात गेले.

३३ हजार स्वयंसेवकांचा सहभाग

या भव्य दीपोत्सवासाठी सुमारे ३३ हजार स्वयंसेवकांनी मागील काही महिन्यांपासून तयारी केली होती. अवध विद्यापीठ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण सरयू तटावर दिवे लावण्याचे काम केले. २०१७ पासून योगी सरकारने सुरू केलेला दीपोत्सव आता जागतिक पातळीवर ओळखला जाणारा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव बनला आहे. हा अद्वितीय सोहळा अनुभवण्यासाठी देश-विदेशातून हजारो भाविक अयोध्येत दाखल झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ayodhya Deepotsav Sets World Record with Over 2.8 Million Lamps

Web Summary : Ayodhya celebrated Deepotsav lighting 2.8 million lamps on the Saryu River banks, setting a Guinness World Record. The city was adorned with flowers and lights, echoing the return of Lord Rama. Uttar Pradesh's Chief Minister Yogi Adityanath welcomed symbolic representations. Thousands of volunteers contributed to the grand event.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशDiwaliदिवाळी २०२५yogi adityanathयोगी आदित्यनाथ