नेपाळमध्ये सचिनसोबत जबरदस्त डांस अन् रोमान्स, पाकिस्तानी सीमाचे व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 15:32 IST2023-07-11T15:31:19+5:302023-07-11T15:32:57+5:30
नेपाळमध्ये सचिनसोबतचा रोमान्स असो अथवा हिंदी चित्रपटांतील गाण्यावरील डान्स, सीमाच्या रील्सना जबरदस्त पसंती मिळत आहे.

नेपाळमध्ये सचिनसोबत जबरदस्त डांस अन् रोमान्स, पाकिस्तानी सीमाचे व्हिडिओ व्हायरल
केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरात सीमा आणि सचिनच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरू आहे. आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातूनभारतीय प्रियकराकडे आलेली सीमा हैदर केवळ पेपेर आणि टीव्हीच नाही, तर सोशल मीडियावरही चर्चेत आहे. सीमाचे व्हिडिओ इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही जबरदस्त व्हायरल होत आहेत. नेपाळमध्ये सचिनसोबतचा रोमान्स असो अथवा हिंदी चित्रपटांतील गाण्यावरील डान्स, सीमाच्या रील्सना जबरदस्त पसंती मिळत आहे.
PUBG गेमच्या सहाय्याने आपल्या आयुष्याला नवे वळण देणारी सीमा सोशल मीडियावरही जबरदस्त सक्रिय आहे. ती इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरही व्हिडिओ तयार करत होती. आपण मार्च महिन्यात नेपाळमध्ये सचिनसोबत सात दिवस घालवल्याचेही तिने स्वत:च टीव्हीवरील एका मुलाखतीत म्हटले होते. तेव्हा तिने काही क्षण कॅमेऱ्यात कैद केले होते. जेणेकरून पुन्हा भेट होऊ शकली नाही, तर या क्षणांसोबत आयुष्य घालवता येईल. मात्र, मे महिन्यात ती पुन्हा एकदा नेपाळमध्ये आली आणि यावेळी ती थेट सीमा ओलांडून भारतातही आली.
यानंतर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर 'सीमा हैदर' नावाच्या अकाउंटचे सर्च वाढले आहे. 'सीमा हैदर' नावाच्या एक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर सीमा आणि सचिनचे अनेक व्हडिओ आहेत. मात्र, हे अकाऊंट सीमानेच तयार केलेले आहे की नाही, यासंदर्भात अद्याप पुष्टी झालेली नाही. पण या अकाउंडवर मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत. एवढेच नाही, तर फॉलोअर्स, लाइक्स आणि व्ह्यूजची संख्या सातत्याने वाढत आहे.
लोग सीमा आणि सचिन यांच्या लव्ह स्टोरीची तुलना गदर चित्रपटाच्या स्टोरीसोबत करत आहेत...