Indian Navy: त्रिशूळ पर्वतावर मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे नौदलाचे सहा जवान बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:12 IST2021-10-01T17:12:13+5:302021-10-01T17:12:35+5:30
नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या बचाव पथकाने कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली त्रिशूळ पर्वताकडे रवाना झाली आहे. जोशीमठापर्यंत हे पथक गेले आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पुढे जाऊ शकलेले नाहीत.

Indian Navy: त्रिशूळ पर्वतावर मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे नौदलाचे सहा जवान बेपत्ता
Uttarkashi Avalanche: उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूळवर गिर्यारोहणासाठी गेलेल्या नौदलाच्या टीमवर हिमस्खलन झाले आहे. यामुळे पाच जवान आणि एक पोर्टर बेपत्ता झाले आहेत. त्रिशूळ पर्वतावर चढाई करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. (Uttarakhand: Navy's mountaineering team washed away in avalanche; 5 out of 10 rescued so far)
नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या बचाव पथकाने कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली त्रिशूळ पर्वताकडे रवाना झाली आहे. जोशीमठापर्यंत हे पथक गेले आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पुढे जाऊ शकलेले नाहीत. हवामान ठीक होताच मदतकार्य सुरु करण्यात येणार आहे.
नौदलाचे 20 सदस्यीय दल १५ दिवसांपूर्वी 7,120 मीटर उंच त्रिशूळ पर्वतावर गेले होते. शुक्रवारी सकाळी या टीमवर हिमस्खलन झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता झाली. पाच जवान आणि एक पोर्टर बेपत्ता झाले आहेत. माऊंट त्रिशूळ हे तीन पर्वतांचे बनलेले आहे. इथे जाण्यासाठी चमोली आणि जोशीमठ येथून मार्ग आहे. सैन्याने देखील त्यांचे शोधकार्य सुरु केले आहे. हेलिकॉप्टर आणि काही टीम त्यांच्या शोधासाठी पाठविण्यात आली आहेत.