देशमुखांविराेधात चाैकशी निष्फळ करण्याचे प्रयत्न; सीबीआयचे शपथपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 07:14 IST2022-01-12T07:14:32+5:302022-01-12T07:14:41+5:30
तपास प्रभावित हाेईल असे वेगवेगळे गुन्हे राज्य सरकारकडून दाखल हाेत आहेत, असे सीबीआयने सर्वाेच्च न्यायालयात म्हटले आहे.

देशमुखांविराेधात चाैकशी निष्फळ करण्याचे प्रयत्न; सीबीआयचे शपथपत्र
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविराेधात सुरू असलेली चाैकशी निष्फळ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न हाेत आहेत. तपास प्रभावित हाेईल असे वेगवेगळे गुन्हे राज्य सरकारकडून दाखल हाेत आहेत, असे सीबीआयने सर्वाेच्च न्यायालयात म्हटले आहे.
सीबीआयने सर्वाेच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे, की मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविराेधातील प्रकरणांचा तपास सीबीआयकडे साेपविण्याचा निर्णय याेग्य आहे. सीबीआयने याबाबत सखाेल तपास केला असून यासंबंधी अनेक कागदपत्रे गाेळा केली आहेत. मात्र, तपासात हस्तक्षेप करण्याचे व तपास धाेक्यात आणण्याचे पूर्ण प्रयत्न राज्य सरकारकडून हाेत आहेत. याची नाेंद घेऊन न्यायालयाने असे प्रयत्न अपयशी ठरतील, अशी पावले उचलण्याची विनंती सीबीआयने केली.