डॉ. कफील खानच्या भावावर जीवघेणा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 01:10 IST2018-06-11T01:10:47+5:302018-06-11T01:10:47+5:30

बीआरडी रुग्णालयात झालेल्या बालमृत्युकांडानंतर चर्चेत आलेले डॉ. कफील खान यांचा भाऊ कासिफ खान याच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला.

Attack on Dr. Kafeel Khan's brother | डॉ. कफील खानच्या भावावर जीवघेणा हल्ला 

डॉ. कफील खानच्या भावावर जीवघेणा हल्ला 

गोरखपूर - बीआरडी रुग्णालयात झालेल्या बालमृत्युकांडानंतर चर्चेत आलेले डॉ. कफील खान यांचा भाऊ कासिफ खान याच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरापासून काही अंतरावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कासिफ यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कासिफ याला तीन गोळ्या लागल्या. 



 रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. कासिफ यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार कासिफ काही वैयक्तिक काम करून घरी परतत होते. ते गोरखनाथ मंदिराजवळील पूल ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची वाट अडवली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कासिफ यांना तीन गोळ्या लागल्या. मात्र अशा परिस्थितीतही कासिफ हे दुचाकी चालवत रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर या घटनेची कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.  

Web Title: Attack on Dr. Kafeel Khan's brother