बदनामीची भीती दाखवून तरुणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 08:22 IST2021-06-29T08:22:37+5:302021-06-29T08:22:57+5:30

१९ मे ते १७ जूनदरम्यान नगर-सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली.  सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

Atrocities on young women for fear of defamation | बदनामीची भीती दाखवून तरुणीवर अत्याचार

बदनामीची भीती दाखवून तरुणीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो काढून नंतर बदनामीची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी  एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

१९ मे ते १७ जूनदरम्यान नगर-सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली.  सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

पैशांचीही मागणी
नगर शहरात राहणारी तरुणी व सोहेल हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. सोहेल याने या तरुणीशी मैत्री करून तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर तरुणीला एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे तिला एक गोळी खाण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर सोहेल याने पीडित तरुणीकडे पैशांची मागणी करत पुन्हा बदनामीची भीती दाखविली. त्यामुळे या तरुणीने घरातील आठ ग्रॅम वजनाचे दागिने आरोपीच्या हवाली केले. 

Web Title: Atrocities on young women for fear of defamation