Atique Ahmed News Updates : हत्येपूर्वी अतिक अहमदने सुप्रीम कोर्टाला लिहिले होते पत्र, लिफाफामध्ये नेमकं काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 17:21 IST2023-04-17T17:19:54+5:302023-04-17T17:21:15+5:30
गँगस्टर अतिक अहमदने आपल्या हत्येपूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला एक पत्र लिहिले होते. त्याची हत्या होण्याची भीती त्याने यात व्यक्त केली होती.

Atique Ahmed News Updates : हत्येपूर्वी अतिक अहमदने सुप्रीम कोर्टाला लिहिले होते पत्र, लिफाफामध्ये नेमकं काय आहे?
अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांनी सुप्रीम कोर्टासाठी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांचे वकील विजय मिश्रा सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. या पत्रात अतिकने आपल्या हत्येची भीती व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. या पत्रात अतिकने विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींची नावेही लिहिली आहेत, असा दावाही यात केला आहे. अतिकच्या विरोधात कट रचला आहे तसेच त्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याला पाठिंबा दिला आहे. या पत्रात काय आहे याचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
अतिक अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून केलेल्या काही गोष्टी आहेत. हस्तलिखित पत्र 'भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांना' असे लिहिले होते. अतिक यांनी हे पत्र एका माजी खासदाराच्या भूमिकेतून सर्वोच्च न्यायालयाला लिहिले आहे. 'अतीक अहमद, माजी खासदार' असे पत्रात लिहिले आहे. खाली कार्यालयाचा पत्ता आणि काही फोन नंबर दिले आहेत.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची सुरक्षा गराड्यातच तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शनिवारी रात्री १०.३० वाजता प्रयागराजमधील कोल्विनबाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर झालेल्या दुहेरी हत्याकांडावरून राजकीय खळबळ उडाली आहे.
विरोधक उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि तेथील पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेच्या रात्रीच या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन हल्लेखोरांची पार्श्वभूमी आणि हत्येमागील त्यांचा हेतू अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर सध्या चर्चेला वेग आला आहे.