Atiq Ahmad Shot Dead: अतिक-अशरफ हत्याकांडानंतर केंद्राचा मोठा निर्णय; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 14:38 IST2023-04-16T14:37:37+5:302023-04-16T14:38:08+5:30
Atiq-Ashraf Shot Dead News: अतिक आणि अशरफची हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपींनी सरेंडर केले आहे.

Atiq Ahmad Shot Dead: अतिक-अशरफ हत्याकांडानंतर केंद्राचा मोठा निर्णय; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार होणार
Atiq Ahmad Shot Dead:उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची मीडियासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी दोघांवर बेछुट गोळीबार केली. सुदैवाने यावेळी इतर कोणालाही गोळी लागली नाही. दरम्यान, या घटनेनंतर केंद्र सरकार पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार करणार आहे.
पत्रकार बनून आलेल्या तिघांनी अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांनी पोलिसांसमोर एका मागून एक गोळ्या चालवल्या. सुदैवाने इतर कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनंतर सरकार अलर्ट झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय (MHA) पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पत्रकारांना सुरक्षा देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
दोन भावांची कॅमेऱ्यासमोर गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर यूपी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, ही घटना पोलिसांच्या संरक्षणात घडली. यामुळे यूपीत गुन्हेगारांचे मनोबल उंचावले गेले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी एकूण 18 राउंड गोळीबार केला. गोळी लागल्याने दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.
सर्वत्र पोलीस तैनात
यावेळी प्रयागराजमधील रस्त्यांवर शांतता आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दुकानेही बंद आहेत. प्रत्येक कारवाईवर पोलिसांची नजर आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडून पोलिसांना कडक देखरेखीच्या सूचना मिळाल्या आहेत. काल रात्री उशिरापर्यंत राज्यात बैठकांचा फेरा सुरू होता. आज शवविच्छेदन वेळेवर झाले तर दोघांचा दफनविधी होऊ शकतो.