आठवलेंचा दिल्लीत स्वबळाचा नारा! RPI ने १५ उमेदवारांची नावे केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:25 IST2025-01-11T15:21:01+5:302025-01-11T15:25:24+5:30
Delhi elections 2025: एनडीएतील घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

आठवलेंचा दिल्लीत स्वबळाचा नारा! RPI ने १५ उमेदवारांची नावे केली जाहीर
Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या राजकारणात अनेक पक्ष मैदानात उतरले आहेत. एकीकडे इंडिया आघाडीतील प्रमुख वेगवेगळे लढत असताना, आता एनडीएचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी १५ उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. (Delhi Assembly Elections 2025)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आरपीआयच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ : कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?
सुल्तानपूर माजरा विधानसभा मतदारसंघ - लक्ष्मी
कोंडली विधानसभा मतदारसंघ - आशा कांबळे
तिमरपूर विधानसभा मतदारसंघ - दीपक चावला
पालम विधानसभा मतदारसंघ - विरेंदर तिवारी
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ - शुभी सक्सेना
प्रतापगंज विधानसभा मतदारसंघ - रणजित
लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघ - विजय पाल सिंह
नरिला विधानसभा मतदारसंघ - कन्हैया
संगम विहार विधानसभा मतदारसंघ - तजेंदर सिंह
मालविय नगर विधानसभा मतदारसंघ - राम नरेश निशाद
तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघ - मंजूर अली
सदर बाजार विधानसभा मतदारसंघ - मनीषा
बदारपूर विधानसभा मतदारसंघ - हर्षित त्यागी
चांदणी चौक विधानसभा मतदारसंघ - सचिन गुप्ता
मटिया महल विधानसभा मतदारसंघ - मनोज कश्यप
केजरीवालांविरोधातही उतरवला उमेदवार
आठवले यांच्या आरपीआयने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. शुभी सक्सेना यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.