लग्नात जेवण करत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व्यक्तीने रसगुल्ला खाल्ला पण, तो घशातच अडकला. त्यामुळे श्वास कोंडला आणि व्यक्ती मंडपातच पडली. त्यानंतर तातडीने व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ललित सिंह असे मयत व्यक्तीचे नाव असून, झारखंडमधील जमशेदपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
ललित सिंह हे मलियंता गावात होत असलेल्या नातेवाईकाच्या लग्नाला आले होते. लग्न लागल्यानंतर ते जेवण करायला बसले. त्यांनी रसगुल्ला खाल्ला मात्र तो घशातच अडकला. त्यांना श्वास घ्यायलाच त्रास होऊ लागला. त्यामुळे लोक त्यांच्या मदतीसाठी जवळ आले.
लोकांनी प्रयत्न केला, पण...
लोकांनी ललित सिंह यांच्या घशात अडकलेला रसगुल्ला काढण्याचे प्रयत्न केले, पण तो निघाला नाही. यातच ललित सिंह यांची प्रकृती बिघडली. त्यांना गुदमरायला लागले. प्रकृती बिघडत असल्याचे बघून लगेच त्यांना एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
शुक्रवारी (१३ मार्च) रात्री उशिरा ही घटना घडली. शनिवारी त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.
डॉक्टरांनी सांगितले मृत्यूचे कारण
ललित सिंह यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली. एमजीएम रुग्णालयाचे डॉ. रोहित झा म्हणाले की, 'एपिग्लॉटिस एक अशी ग्रंथी आहे, जी जेवण श्वसन नलिकेत जाण्यापासून रोखते. पण, नशेत किंवा बोलत बोलत जेवण करत असताना ही ग्रंथी काम करत नाही. त्यामुळे अन्न श्वसन नलिकेत अडकते. त्यामुळे जीव जाण्याची भीती असते. त्यामुळे जेवण करत असताना हसणे टाळले पाहिजे.'
Web Summary : A 41-year-old man died at a wedding in Jamshedpur after a rasgulla became lodged in his throat, causing him to choke. Doctors said the epiglottis malfunctioned, leading to airway obstruction. Eating while talking or intoxicated increases the risk.
Web Summary : जमशेदपुर में शादी समारोह में एक 41 वर्षीय व्यक्ति की रसगुल्ला गले में फंसने से मौत हो गई। डॉक्टरों ने कहा कि एपिग्लॉटिस के ठीक से काम न करने के कारण श्वास नली में रुकावट आई। बात करते या नशे में खाते समय खतरा बढ़ जाता है।