अटलजींच्या अस्थींचे देशभर होणार विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:31 IST2018-08-23T05:30:57+5:302018-08-23T05:31:14+5:30
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यो ‘अस्थीकलश यात्रा’ देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काढून त्या अस्थींचे सर्व नद्यांमध्ये विसर्जन करण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे.

अटलजींच्या अस्थींचे देशभर होणार विसर्जन
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यो ‘अस्थीकलश यात्रा’ देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काढून त्या अस्थींचे सर्व नद्यांमध्ये विसर्जन करण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना या लाडक्या दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहता यावी, यासाठी पक्षाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
राष्ट्रीय पक्ष मुख्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात वाजपेयींच्या अस्थींचे कलश पक्षाच्या विविध राज्य अध्यक्षांकडे सुपुर्द केले गेले. अस्थींचे विसर्जन मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगांव, कराड, कर्जत, महाड और सांगली येथ होणार आहे.